🕒 1 min read
पुणे – पुण्याच्या राजकारणात सध्या काय शिजतंय, याचा अंदाज लावणं भल्याभल्यांना जमेनासं झालंय! पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो ‘बॉम्ब’ टाकलाय, त्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा सुरू असतानाच, आता दादांनी थेट ‘पुणेकरांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत’ देण्याचं वचन दिलंय. ही घोषणा म्हणजे पुणे महापालिका निवडणुकीतील ‘गेमचेंजर’ मानली जात आहे.
Ajit Pawar NCP Manifesto Pune
पुणे आणि पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्यात अजितदादांनी (Ajit Pawar) हा मोठा धमाका केलाय. “पुणेकरांचे पेट्रोलमध्ये रोज साडेसात कोटी रुपये जळतात,” हे धक्कादायक वास्तव मांडत अजितदादांनी आपल्या आश्वासनाचं गणितच मांडलं. ते म्हणाले, “पुण्यात ट्रॅफिकमुळे वर्षाला १०,८०० कोटी रुपये वाया जातात. हे पैसे वाचवले तर मेट्रो आणि बसचा प्रवास फुकट देणं काहीच अवघड नाही. मी अनेक तज्ज्ञांशी बोललोय, आमच्या हातात सत्ता द्या, मी हे करून दाखवतोच!”
५०० फुटांपर्यंत टॅक्स माफ!
फक्त प्रवासच नाही, तर मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घरांच्या टॅक्सवरही दादांनी हात घातलाय. १ एप्रिल २०२६ पासून ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ असेल. इतकंच नाही तर, पुण्यात टँकर माफियांचा सुळसुळाट झालाय, तो संपवून ‘२४ तास हाय प्रेशर पाणी’ देण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यात आहे.
विद्यार्थ्यांना इंटरनेट डेटासह मोफत टॅबलेट, शहरात २०० ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’ आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसायासाठी ५ लाखांच बिनव्याजी कर्ज… अजितदादांनी अक्षरशः आश्वासनांचा पाऊस पाडलाय. गुंठेवारीचा प्रश्नही अवघ्या ३ महिन्यांत निकाली काढू, असा शब्द त्यांनी (Ajit Pawar) दिलाय.
“बाहेरून येणाऱ्यांना पुण्याचा काय जिव्हाळा? आम्ही इथे राहतो,” असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही जोरदार चिमटा काढलाय. आता पुणेकर या ‘फुकट’च्या प्रवासाला आणि विकासाच्या मॉडेलला पसंती देतात की नाही, हे पाहणं रंजक ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- “विराटचे वनडे रेकॉर्ड्स काहीच नाहीत?” मांजरेकरांचा पुन्हा ‘नवा’ वाद; म्हणाले, “१-२ नंबरला बॅटिंग करणं तर…”
- सारा तेंडुलकरचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहिल्यांदाच बोलली अस्खलित मराठी!
- IND vs NZ: भारताला धूळ चारण्यासाठी न्यूझीलंडचा ‘हा’ आहे गेमप्लॅन; Playing 11 मध्ये मोठे बदल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










