Share

“बापाची चप्पल पायात आली म्हणून…” अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राष्ट्रवादीचा महेश लांडगेंवर ‘काटा काढ’ वार!

अजित पवारांवरील एकेरी टीकेनंतर सूरज चव्हाण यांनी महेश लांडगेंचा समाचार घेतला. “बापाची चप्पल पायात आली म्हणून शहाणं समजू नये,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published On: 

Mahesh Landge vs Ajit Pawar

पुणे – राजकारणात गुरु-शिष्याचं नातं कधी संपत आणि कट्टर दुश्मनी कधी सुरू होते, याचा काहीच नेम नाही, आणि याचाच प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये येतोय. Pimpri-Chinchwad च्या राजकीय आखाड्यात सध्या शाब्दिक कुस्त्या रंगात आल्या आहेत. भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करत डिवचल्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या गोटातून अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. “बापाची चप्पल पायात आली म्हणून लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी लांडगेंना घेरलं आहे.

अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. लांडगे यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून टीका करताना “तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?” अशा एकेरी भाषेत आव्हान दिलं होतं. याला प्रत्युत्तर देताना सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित लांडगेंचा समाचार घेतला आहे.

NCP Suraj Chavan vs BJP Mahesh Landge

“वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो…”

सूरज चव्हाण यांनी लांडगेंना त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. ते म्हणतात, “महेश लांडगे हा सुरुवातीला अजितदादांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवत असतो. अजितदादा ज्यावेळी तो डाव टाकतील, तेव्हा लांडगेचं चित होणं ठरलेलं आहे.” एवढंच नाही तर, लांडगे पुन्हा राजकीय मैदानात दिसणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गेल्या काही दिवसांपासून Ajit Pawar आणि महेश लांडगे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. अजित पवारांनी लांडगेंचा उल्लेख ‘भ्रष्टाचाराचा आका’ असा केला होता. यावर संतापलेल्या लांडगेंनी थेट मोदींच्या वक्तव्याचा दाखला देत, “मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि संध्याकाळी अजित पवार भाजपात आले,” असा टोला लगावला होता. तसेच “तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील,” असं म्हणत लांडगेंनी अजितदादांना ललकारलं होतं. आता या ‘तू-तू-मैं-मैं’ मुळे पिंपरीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.

 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही