Share

“दाखव रे तो फोटो…”; आदित्य ठाकरेंनी पुन्हा केली फडणवीसांची ‘मिमिक्री’, शिवाजी पार्कवर हास्याचे फवारे!

“आमची सत्ता येणार…” म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री केली आणि ‘लाव रे तो फोटो’ म्हणत भाजपला धारेवर धरले.

Published On: 

Aaditya Thackeray Mimicry Devendra Fadnavis

🕒 1 min read

मुंबई – राजकारणात टीकाटिपणी नवीन नाही, पण जेव्हा त्यात ‘मिमिक्री’चा तडका लागतो, तेव्हा सभा गाजतेच! मुंबईच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पार पडलेल्या ऐतिहासिक ‘शिवशक्ती’ सभेत याचाच प्रत्यय आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाषणादरम्यान चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) नकल करत उपस्थितांना खळखळून हसवलं. त्यांच्या या ‘अॅक्ट’ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Aaditya Thackeray Mimicry Devendra Fadnavis

“आमची मुंबईत सत्ता येणार…”

सभेच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत ते म्हणाले, “मला अनेकांनी आग्रह केला की आजच्या सभेतही ती मिमिक्री करून दाखवा.” त्यानंतर क्षणार्धात फडणवीसांच्या शैलीत, “आमची मुंबईत सत्ता येणार… मोदी साहेब भाजपचा जलवा दिसणार… आपली सत्ता येणार…” असा आवाज काढत आदित्य यांनी नक्कल केली. त्यांच्या या कृतीला शिवसैनिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड दाद दिली.

“काका आहेत, थोडी लिबर्टी घेतो…”

विशेष म्हणजे, यावेळी आदित्य यांनी काका राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) “लाव रे तो व्हिडिओ” या प्रसिद्ध डायलॉगचा आधार घेत “दाखव रे तो फोटो” म्हणत भाजपला घेरलं. “राज काका आहेत, त्यामुळे थोडी लिबर्टी घेतो,” असं म्हणत त्यांनी कोस्टल रोडच्या कामाचे फोटो स्क्रीनवर दाखवले. “कोस्टल रोडच्या भूमिपूजनात फडणवीस कुठे आहेत? ३००० रुपये देतो, दाखवा तुमचे फोटो,” असं खुलं चॅलेंजच त्यांनी दिलं. “गिफ्ट सिटी आणि उद्योग गुजरातला पळवणं हेच तुमचं मुंबईसाठी योगदान आहे का?” असा सवालही त्यांनी भाजपला विचारला.

जयंत पाटलांकडून कौतुक

दरम्यान, तामिळनाडू भाजपचे नेते अन्नामलाई यांचाही आदित्य यांनी समाचार घेतला. “ज्यांचं स्वतःचं डिपॉझिट जप्त झालंय, त्यांनी आम्हाला मुंबई शिकवू नये,” अशा शब्दांत त्यांनी सुनावले. आदित्य यांच्या या आक्रमक भाषणानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. “उद्धवजी, आदित्यने मुंबईची नस ओळखली आहे. ते आता मुंबई सांभाळायला सक्षम आहेत, तुम्ही आता राज्याकडे लक्ष द्यायला मोकळे आहात,” अशी पावतीच पाटलांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)