🕒 1 min read
मुंबई – राजकारणात कधी काय होईल आणि कोणाची गाठ कोणाशी पडेल, हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय मुंबईकरांना पुन्हा एकदा आलाय. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीमुळे मुंबईचं राजकारण चांगलंच तापलंय, तर दुसरीकडे ‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी प्रचारात घेतलेली एक ‘एंट्री’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
महापालिका निवडणूक (BMC Election 2026) अवघ्या काही दिवसांवर आली असल्याने आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) सध्या मुंबईच्या रस्त्यावर उतरले आहेत. ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी ते घरोघरी फिरत आहेत. पण, या प्रचारादरम्यान एक रंजक किस्सा घडला. पवईतील हिरानंदानी गार्डन परिसरातील वॉर्ड क्र. १२२ मध्ये उमेदवार निलेश साळुंखे यांच्यासाठी बांदेकर प्रचार करत होते. त्यांनी एका घराची बेल वाजवली आणि दार उघडताच समोर चक्क सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) उभे होते!
Aadesh Bandekar UBT election campaign
बांदेकरांनी या क्षणाचा व्हिडिओ शेअर करताना एका शब्दांत मोठी राजकीय कोटी केली आहे. त्यांनी केदार शिंदेंच्या भेटीचा फोटो शेअर करत त्याला ‘युती’ असं कॅप्शन दिलंय. बांदेकर लिहितात, “प्रचार करताना अचानक लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांची भेट झाली.” त्यामुळे हा केवळ राजकीय प्रचार राहिला नसून त्याला आता ग्लॅमरचा तडकाही लागल्याचं बोललं जातंय.
येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई महापालिकेसाठी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. आदेश बांदेकर हे केवळ टीव्हीवरचे ‘भावोजी’ नाहीत, तर २०१२ पासून ते शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही त्यांनी पक्षकार्य सोडले नाही, हे विशेष. आता ही ‘ठाकरे-शिंदे’ (केदार शिंदे) भेट मतपेटीत किती जादू करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?” महेश लांडगेंचा अजितदादांवर एकेरी वार; महायुतीत मोठी ठिणगी!
- “रस्त्यात खड्डा पडला तर तिथेच गाडेन..!”; राज ठाकरेंचा ‘तो’ किस्सा ऐकून नाशिककर अवाक!
- “ज्यांना स्वतःला पोरं नाहीत, ते काय..”; ठाकरेंचा फडणवीसांवर ‘पर्सनल’ वार; नाशिकमध्ये भडका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










