रविकांत तुपकरांचा मायक्रो फायनान्स आणि बँकांना इशारा; ‘दुष्काळ सोसण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांचा आहे का?’

रविकांत तुपकरांनी ‘दुष्काळ संघर्ष यात्रे’दरम्यान मायक्रो फायनान्स आणि बँकांच्या सक्तीच्या कर्जवसुलीवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Published On: 

Ravikant Tupkar addressing farmers during Dushkal Sangharsh Yatra

बुलढाणा, 18 नोव्हेंबर: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खाजगी बँकांच्या सक्तीच्या कर्जवसुलीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून सुरू असलेल्या ‘दुष्काळ संघर्ष यात्रे’दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील सोनगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) या यात्रेचा पाचवा दिवस होता. या सभेत त्यांनी बँकांच्या वसुलीच्या भूमिकेवर सडकून टीका केली.

मायक्रोफायनान्स कंपन्या आणि बँकांनी आजवर शेतकऱ्यांच्या जीवावर हजारो कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी अनेक वर्षे नफा मिळवला असून आता दुष्काळामुळे शेतकरी संकटात असल्याने कंपन्यांनीही थोडा तोटा सहन करावा, असे तुपकर म्हणाले. “एक वर्ष नफा नाही मिळाला तर तुमच्या कंपन्या मरतात का? दुष्काळ सहन करण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

बुलढाण्यात मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचाही तुपकरांनी कडक शब्दांत समाचार घेतला. “आमच्यावर अप्रत्यक्ष टीका करता? मला त्याचा फरक पडत नाही. अंगावर आलात तर कार्यक्रमच लावून टाकीन!” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. तसेच, देशाचा जवान आणि जगाचा पोशिंदा शेतकरी आज आतल्या आत गुदमरत असल्याचे ते म्हणाले.

सरकारला दुष्काळाची कल्पना वर्षभरापासून होती, मग शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर का आणून ठेवले, असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ही यात्रा काढल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे. या यात्रेमुळे दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वातावरण पुन्हा तापणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही