कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 सह अतिरेकी असल्याचा AI व्हिडीओ व्हायरल; बोरीवली पोलिसांत FIR दाखल

कांदिवली स्थानकात एके-४७ घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा ५ सेकंदांचा AI बनावट व्हिडीओ व्हायरल. बोरीवली पोलिसांकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल, सायबर पोलिसांचा तपास सुरू.

Published On: 

Kandivali railway station fake AI video viral FIR registered

मुंबई, 18 नोव्हेंबर: कांदिवली रेल्वे स्थानकामध्ये एके-४७ (AK-47) रायफल घेऊन एक पाकिस्तानी दहशतवादी फिरत असल्याचा दावा करणारा पाच सेकंदांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ एआयच्या (AI) मदतीने तयार करण्यात आलेला पूर्णपणे बनावट व्हिडीओ असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

हा व्हिडीओ १६ नोव्हेंबर रोजी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रेल्वे पोलिसांना पाठवण्यात आला होता. या व्हिडीओमुळे रेल्वे पोलीस आणि आरपीएफ (RPF) यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. प्रशासनाने तात्काळ रेल्वे स्थानकावरील संपूर्ण दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि स्थानक परिसराची कसून झाडाझडती घेतली. मात्र, तिथे कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा अनुचित घटना आढळून आली नाही.

तांत्रिक तपासणीत हा व्हिडीओ बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता सायबर पोलिसांकडून मूळ अकाउंट आणि हा व्हिडीओ बनवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. एआय ॲप्सचा वापर करून अवघ्या काही मिनिटांत असे वास्तवदर्शी वाटणारे व्हिडीओ बनवले जात असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली. सद्यस्थितीत मुंबईत एआयच्या माध्यमातून बनवलेल्या खोट्या व्हिडीओंचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी गेटवे ऑफ इंडियाला त्सुनामी, फिल्म सिटीत आग, कुर्ला मॉलमध्ये बिबट्या, मुंबई हार्बरमध्ये महाकाय मगर आणि उड्डाणपूल कोसळल्याचे खोटे व्हिडीओदेखील व्हायरल करण्यात आले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही