नागपुरात कुख्यात गुंड पलाश वासनिकची निर्घृण हत्या; डोक्यावर सिमेंटची कुंडी घालून संपवलं

नागपुरातील मेडिकल चौकात कुख्यात गुंड पलाश वासनिकची सिमेंटच्या कुंडीने ठेचून हत्या. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मेहुण्यानेच खून केल्याचा प्राथमिक संशय.

Published On: 

Buldhana clash between Shiv Sena and NCP two killed

नागपूर, 14 नोव्हेंबर: नागपूरच्या अत्यंत वर्दळीच्या मेडिकल चौकात गुरुवारी रात्री उशिरा कुख्यात गुंड पलाश वासनिक याची निर्घृण हत्या करण्यात आली. भररस्त्यात चाकूने वार करून आणि डोक्यावर सिमेंटची कुंडी टाकून त्याला संपवण्यात आले. या थरारक घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुरुवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजच्या गेटजवळ हा थरार घडला. हल्लेखोरांनी सुरुवातीला पलाशवर चाकूने सपासप वार केले. तो जमिनीवर कोसळल्यानंतर त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सिमेंटची कुंडी घालून डोकं छिन्नविछिन्न करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पलाशचा जागीच मृत्यू झाला, तर घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.

मृत पलाश वासनिकवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे, ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. या हत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक चर्चा आहे. पलाश स्वतःच्या बहिणीला त्रास देत होता, याच कारणातून त्याचा मेहुणा चिंटू ऊर्फ आयुष धुपे याने साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या माहितीला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

हत्येच्या घटनेनंतर मेडिकल चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग केले असून, फरार आरोपींचा शोध आणि हत्येच्या नेमक्या कारणाचा कसून तपास सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही