प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्याच गटाच्या पालकमंत्र्यांवर चांगलेच संतापले आहेत. ‘पक्ष वाढवायचा आहे की संपवायचा आहे?’ असा थेट सवाल करत त्यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत.
शिंदे गटाचे आमदार, जिल्हाप्रमुख आणि उपजिल्हाप्रमुखांनी पालकमंत्र्यांच्या कारभाराबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. हे मंत्री पक्ष संघटनेच्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून, जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षित प्रयत्न होत नसल्याची तक्रार या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
अनेक पालकमंत्री हे केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिले असल्याचा आरोपही या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी एकत्रितपणे शिंदेंसमोर कैफियत मांडत, अशा परिस्थितीत जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवायची कशी? असा प्रश्न उपस्थित केला.
या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी संबंधित मंत्र्यांची कानउघाडणी केली. पालकमंत्र्यांनी तातडीने आपल्या कामात बदल करावा, संघटनेला वेळ द्यावा आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वय वाढवावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, ‘कामात लवकर बदल करा, हे योग्य नाही,’ अशा शब्दांत समज देत आगामी काळात पक्ष बळकटीकरणासाठी जिल्ह्यात सक्रिय राहण्याच्या सूचनाही शिंदेंनी पालकमंत्र्यांना दिल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनील तटकरे पुण्यात, सुनेत्रा पवारांची घेणार भेट; विलिनीकरणाच्या चर्चेसह अर्थखात्यावर केले थेट भाष्य
- गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईक आणि संजय राऊतांची भेट
- ऐन दिवाळीत राजकीय घडामोडी; मंत्री प्रताप सरनाईक यांची संजय राऊतांची अचानक भेट
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








