कोल्हापूर, 25 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून सहकार वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बहुमतात असलेल्या राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विरोधकांना एक सूचक आवाहन केले आहे. हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांचे नाव घेत त्यांनी पलीकडील १२ जणांना २९ ऑक्टोबरच्या बैठकीला उपस्थित राहून, तांत्रिक मुद्द्यांऐवजी जनमताचा आदर करण्याची विनंती केली आहे.
गोकुळच्या संचालक मंडळ सभेत अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांच्या उपस्थितीचा फोरम पूर्ण असणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा नियम निवडीत अडसर ठरू शकतो का, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आपल्या आघाडीला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट करत पाटील यांनी २५ संचालकांनी एकत्र येऊन संस्थेचा कारभार पाहावा आणि पुन्हा निवडणुकीची वेळ येऊ देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. एका मतानेही विजय मिळवता येतो, याची आठवणही त्यांनी करून दिली.
सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या मुश्रीफ आणि कोरे यांच्या भूमिकांचे परिणाम उद्या संपूर्ण महाराष्ट्रात दिसू शकतात, असे सतेज पाटील म्हणाले. त्यामुळे आगामी बैठकीत सर्वजण उपस्थित राहून फोरम पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गोकुळचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर हेच अध्यक्ष होतील, ही घोषणा पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच केली होती. संस्थापक सदस्याच्या मुलाला संधी मिळत असल्याने विरोधक काही करणार नाहीत आणि सर्व सुरळीत होईल, याबाबत ते सकारात्मक आहेत.
मागील वेळी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव निश्चित होऊनही अरुण डोंगळे यांच्या विश्वासघातकी राजकारणामुळे त्यांना पदापासून वंचित राहावे लागले होते. त्यानंतरच्या घडामोडींत नविद मुश्रीफ यांना चेअरमनपद दिले गेले. हा घटनाक्रम लक्षात ठेवूनच सतेज पाटील यांनी शशिकांत यांना न्याय देण्याची घोषणा केली होती. सत्ता आल्यावर मागील वेळी अध्यक्षपदासाठी आणलेला गुलाल, हार आणि घातलेला मांडव सार्थकी लावणार असल्याचे पाटील यांनी रणांगणातच स्पष्ट केले होते. त्यामुळे आता चुयेकरांचे अध्यक्षपदाचे स्वप्न साकार होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा तापला, ३२ हजार झाडांच्या कत्तलीवरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
- लग्नाच्या आठ महिन्यांतच विजय-रश्मिकाच्या घटस्फोटाची चर्चा; इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेटकऱ्यांचे तर्कवितर्क
- IND vs NZ: ‘पोरं आता मोठी…’, भारताच्या विजयानंतर गौतम गंभीरची पोस्ट चर्चेत
Quick Answers
सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि विनय कोरे यांचे नाव घेत पलीकडील १२ जणांना २९ ऑक्टोबरच्या बैठकीला उपस्थित राहून, तांत्रिक मुद्द्यांऐवजी जनमताचा आदर करण्याची विनंती केली आहे.
गोकुळच्या संचालक मंडळ सभेत अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांच्या उपस्थितीचा फोरम पूर्ण असणे बंधनकारक आहे.
गोकुळचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर हेच अध्यक्ष होतील, ही घोषणा सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वीच केली होती.
मागील वेळी शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव निश्चित होऊनही अरुण डोंगळे यांच्या विश्वासघातकी राजकारणामुळे त्यांना पदापासून वंचित राहावे लागले होते आणि त्यानंतर नविद मुश्रीफ यांना चेअरमनपद दिले गेले होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








