बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार; वडेट्टीवार, ठाकूर आणि सपकाळांचा घणाघात

अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एसआयटी चौकशीच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक झाले असून वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 18 ऑक्टोबर: राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत महायुतीच्या मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिक्षकांना धमकावल्यास एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला होता. तसेच, भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही थेट श्री शिवाजी शिक्षण संस्थेवर टीका केली होती. महायुतीच्या नेत्यांच्या या विधानांवरून काँग्रेस नेते आता आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'एसआयटी चौकशी लावून बघा, तुमचे डोळे काढून त्याच्या गोट्या खेळू,' असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. ज्यांचे हात ३५-४० टक्क्यांच्या कमिशनने बरबटले आहेत, ते कुणाला धमक्या देत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेची झूल बाजूला ठेवा आणि धमकी द्या, तुमचा हिशोब चुकता करू, असा थेट इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची कास धरून प्रवाहात आणले, त्यांच्या शिक्षण संस्थेबाबत एसआयटीची भाषा करणे हा संपूर्ण विदर्भाचा अपमान असल्याचे सपकाळ म्हणाले. बावनकुळे यांच्या प्रॉपर्टीची चौकशी केल्यास त्यांना विदेशात पळून जावे लागेल, असा दावाही त्यांनी केला. विदेशातील क्लबमध्ये कोट्यवधी रुपयांच्या सुटकेस भरून तुम्ही 'एक्का-दुर्री' खेळता, तो पैसा कुठून आला, असा सवाल करत बावनकुळेंना लाज वाटली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही या मुद्द्यावरून भाजपला खडे बोल सुनावले आहेत. भाऊसाहेबांच्या संस्थेवर तुमचे डोळे असून आम्ही विदर्भातली माणसं गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शिवाजी शिक्षण संस्थेकडे वाकड्या नजरेने बघितल्यास आमचा जीव गेला तरी चालेल, पण तुमचा वार यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगतानाच कोणीही 'हिटलरगिरी' करण्याचा प्रयत्न करू नये, असेही यशोमती ठाकूर यांनी ठणकावून सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

शिक्षकांना धमकावल्यास एसआयटी (SIT) चौकशी केली जाईल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही