पुणे, 17 ऑक्टोबर: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधील माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात मोठा राडा झाला आहे. याप्रकरणी दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार शेळके हे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गुजर यांना शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका खोलीत नेले. तिथे आपली बॅग हिसकावून घेत झडती घेण्यात आली आणि त्यानंतर आपल्याला मारहाण केली, असा गंभीर आरोप सुनील गुजर यांनी केला आहे.
दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांनीही गुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुजर हे गेल्या वर्षभरापासून आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. इतरांच्या नावाने आरटीआय अर्ज करून ते आपली माहिती मिळवतात आणि ती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवतात, असा शेळकेंचा आरोप आहे. गुजर यांच्या बॅगेत तपासणीदरम्यान आपल्या नावाशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये गुजर यांना एका खोलीत नेले जात असल्याचे पोलिसांना दिसले आहे. मात्र, या उपलब्ध चित्रणात त्यांना कोणतीही मारहाण झाल्याचे दिसून आलेले नाही.
आपल्याला संबंधित खोलीच्या आत मारहाण झाल्याचा दावा गुजर यांनी केला आहे. परंतु, त्या विशिष्ट खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नसल्यामुळे आमदार शेळके यांच्याकडून मारहाण झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिक्षकांना प्रचाराला जुंपल्यास संस्थाचालकांची SIT चौकशी; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा इशारा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डी. लिट.’ ने होणार सन्मानित; अदाणी इन्स्टिट्यूटचा १७ वा दीक्षांत समारंभ
- अभिजीत दिपके यांना दिल्लीत पुन्हा अटक; मध्यरात्री नेहा बोरांची सुटका, घडामोडींना वेग
Quick Answers
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधील माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात राडा झाला.
सुनील गुजर यांच्या आरोपानुसार, आमदार शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एका खोलीत नेले, त्यांची बॅग हिसकावून झडती घेतली आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली.
गुजर हे वर्षभरापासून आपल्यावर पाळत ठेवून आहेत आणि इतरांच्या नावाने आरटीआय अर्ज करून माहिती मिळवून ती राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवतात, असा आरोप शेळकेंनी केला आहे. तसेच त्यांच्या बॅगेत आपल्या नावाशी संबंधित कागदपत्रे सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुजर यांना एका खोलीत नेले जात असल्याचे दिसले, पण उपलब्ध चित्रणात मारहाण झाल्याचे दिसलेले नाही. संबंधित खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने मारहाण झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








