थंडीमुळे निळे पडले होते ओठ, तरीही शिफॉन साडीत शूट झालं ‘ते’ गाणं; २६ वर्षांनंतरही क्रेझ कायम

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या ‘पुकार’ चित्रपटातील २६ वर्षांपूर्वीच्या ‘किस्मत से तुम हमको मिले’ गाण्याच्या शूटिंगचा रंजक किस्सा समोर आला आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: ९० च्या दशकातील माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या 'पुकार' चित्रपटातील 'किस्मत से तुम हमको मिले' हे रोमँटिक गाणे आजही प्रेक्षकांचे आवडते आहे. या २६ वर्षे जुन्या गाण्याचे शूटिंग अलास्काच्या बर्फाळ ग्लेशियरवर झाले होते. त्यावेळी कडाक्याच्या थंडीमुळे माधुरीची अवस्था इतकी बिकट झाली होती की तिचे ओठ चक्क निळे पडले होते.

पडद्यावर अत्यंत सुंदर दिसणाऱ्या या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव कलाकारांसाठी मात्र खूप आव्हानात्मक होता. या गाण्यात माधुरीने फिक्या रंगाची शिफॉनची साडी नेसली होती. तर दुसरीकडे, थंडीपासून बचाव करण्यासाठी अनिल कपूर यांनी एकावर एक असे अनेक जॅकेट्स घातले होते.

माधुरीने एका मुलाखतीत या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला होता. शूटिंगदरम्यान संध्याकाळ झाल्याने थंडी प्रचंड वाढली होती. कोरिओग्राफर फराह खान माधुरीला गाण्यावर लिपसिंक करायला सांगत होत्या. मात्र, थंडीने ओठ गोठून निळे पडल्यामुळे तिला ते शक्य होत नव्हते. माधुरीची ती अवस्था पाहून सेटवर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी शूटिंग थांबवण्यास सांगितले होते.

जेव्हा दुसऱ्या दिवशी या गाण्याचे शूटिंग पुन्हा सुरू झाले, तेव्हा माधुरीला थंडी वाजू नये म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तिचा सीन शूट होताच एक व्यक्ती तात्काळ तिच्याजवळ ब्लँकेट घेऊन पोहोचायचा. तसेच तिला उबदार ठेवण्यासाठी सेटवर हीटरचीही सोय करण्यात आली होती.

कपिल शर्माच्या शोमध्ये या गाण्याविषयी बोलताना अनिल कपूर यांनीही एक किस्सा शेअर केला होता. त्यांनी सांगितले की, आपण एकावर एक जॅकेट्स घातले होते आणि माधुरी फक्त एका पातळ शिफॉनच्या साडीत होती. माधुरीची साडी हवेत उडताना दाखवण्यासाठी तिथे हेलिकॉप्टर आणण्यात आले होते, पण त्यामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यामुळे माधुरीचा थंडीतील त्रास आणखीच वाढला होता.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

'किस्मत से तुम हमको मिले' या गाण्याचे शूटिंग अलास्काच्या बर्फाळ ग्लेशियरवर झाले होते.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही