प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील खोलीत एका अदृश्य शक्तीचा वावर असल्याचा थरारक खुलासा केला आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय चॅट शोच्या नवव्या आणि शेवटच्या मानल्या जाणाऱ्या सिझनमध्ये सलमानने हा भीतीदायक अनुभव शेअर केला. या भागात त्याच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूरही उपस्थित होती, जिच्या उपस्थितीत सलमानने अनेक गोष्टींवरून पडदा उठवला.
या कार्यक्रमात बोलताना करण जोहरने 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची कथा सांगण्यासाठी सलमानच्या घरी गेल्याची आठवण सांगितली. त्यावेळी सलमानची खोली खूपच लहान होती आणि तिथे फक्त एक पलंग, कपाट व थोडी मोकळी जागा होती, असे करण म्हणाला. याच खोलीच्या संदर्भात बोलताना सलमानने उघड केले की, तिथे त्याला कधीच पूर्णपणे एकटे वाटले नाही. डोळ्यांनी प्रत्यक्ष काही पाहिले नसले तरी, त्याला सातत्याने कोणाची तरी उपस्थिती जाणवायची.
सलमानने सांगितले की, त्याच्या खोलीतील लाइट्स कधीकधी आपोआप चालू आणि बंद व्हायचे. अचानक संगीत वाजू लागायचे आणि कपाटात कोणीतरी काहीतरी करत असल्यासारखे वाटायचे. बाथरूममध्येही अशाच प्रकारच्या शक्तीचा भास होत असल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र, या घटनांमुळे घाबरण्याऐवजी सलमानने त्या अदृश्य शक्तीसोबत चक्क विनोद करायला सुरुवात केली होती.
खोलीत भूत होते का, असा प्रश्न करणने विचारल्यावर सलमानने त्याला भूत म्हणण्यास नकार दिला. तिथे अदृश्य शक्तीची जाणीव नक्की व्हायची, पण त्या शक्तीने आपले कधीही नुकसान केले नाही, असे तो म्हणाला. गाणी लावताना पाठीमागे कोणीतरी उभे असल्यासारखे वाटल्यास, तो हसत हसत तिला कोणती गाणी ऐकायची आहेत ते विचारायचा आणि गाणी लावून निघून जायचा. "जर ती अदृश्य शक्ती स्त्री असेल तर, निदान तिने चेहरा तरी दाखवायचा," अशी मिश्किल टिप्पणी सलमानने करताच करण जोहरलाही हसू अनावर झाले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू; ५५०० रुपयांच्या दरासाठी राजू शेट्टींचे कृष्णा कारखान्यावर ‘काटा बंद’ आंदोलन
- अंकिता भंडारी प्रकरण तापलं! सिक्कीमच्या राज्यपालांवर गंभीर आरोप, ‘VIP’चा ऑडिओ व्हायरल
- अस्वच्छता आणि खराब अन्नावरून FDA ची मुंबईत धडक कारवाई; १७ हॉटेल्ससह डॉमिनोजला दणका
Quick Answers
सलमान खानने त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील खोलीत एका अदृश्य शक्तीचा वावर असल्याचा थरारक खुलासा केला. डोळ्यांनी प्रत्यक्ष काही पाहिले नसले तरी, त्याला तिथे सातत्याने कोणाची तरी उपस्थिती जाणवायची.
सलमानने हा अनुभव करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या नवव्या सिझनमध्ये शेअर केला. या भागात त्याच्यासोबत अभिनेत्री करिश्मा कपूर उपस्थित होती.
सलमानच्या खोलीतील लाइट्स कधीकधी आपोआप चालू-बंद व्हायचे, अचानक संगीत वाजू लागायचे आणि कपाटात कोणीतरी काहीतरी करत असल्यासारखे वाटायचे. तसेच बाथरूममध्येही अशा शक्तीचा भास व्हायचा.
त्या शक्तीला भूत म्हणण्यास सलमानने नकार दिला. तिथे अदृश्य शक्तीची जाणीव नक्की व्हायची, परंतु त्या शक्तीने आपले कधीही नुकसान केले नाही, असे सलमानने स्पष्ट केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







