दिल्ली, 15 ऑक्टोबर: अंकिता भंडारी प्रकरणात सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल आणि भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणात एका ‘व्हीआयपी’चा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, काँग्रेसने या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. उत्तराखंडची कन्या अंकिता हिच्या न्यायासाठी तिच्या पालकांनी दिल्लीत धरणे आंदोलन पुकारले असून काँग्रेसने त्याला उघड पाठिंबा दिला आहे.
बुधवारी अंकिताच्या पालकांनी इंडिया गेटवर आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली. काही वेळातच काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकार आणि पोलिसांविरोधात अनेक तास जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलनाला राजकीय स्वरूप दिले. दरम्यान, दिल्लीत सीजेपीचे कार्यकर्तेही दाखल झाले असून या संघटनेचे दोन प्रमुख नेते सध्या तुरुंगात आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहेत.
इंडिया गेटजवळ सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान, रात्री उशिरा दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी काँग्रेस नेते, पक्ष कार्यकर्ते आणि अंकिताच्या पालकांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर पोलिसांनी पालकांची सुटका केली असली, तरी काँग्रेसचे काही नेते अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
अंकिता भंडारी प्रकरणात भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांचे नाव सातत्याने समोर येत असतानाच त्यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून थेट नियुक्ती झाल्याने अंकिताचे आई-वडील संतप्त झाले आहेत. या प्रकरणातील कथित व्हीआयपी अँगलबाबत सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत गौतम यांची नियुक्ती स्थगित ठेवावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
जर आम्हाला न्याय मिळाला नाही आणि सर्वात आधी दुष्यंत गौतम यांची नियुक्ती रद्द केली नाही, तर मुलीच्या न्यायासाठी आम्ही संपूर्ण देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलने करू, असा स्पष्ट इशारा अंकिताच्या कुटुंबीयांनी दिला आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा उचलून धरत त्यांच्या या भूमिकेला भक्कम साथ दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अस्वच्छता आणि खराब अन्नावरून FDA ची मुंबईत धडक कारवाई; १७ हॉटेल्ससह डॉमिनोजला दणका
- गोव्याला जाण्यापूर्वी नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती ‘ती’ शेवटची इच्छा; सच्चा दोस्त गमावल्याने मकरंद अनासपुरे भावूक
- वारे फिरले! राज्यात पुढील ४-५ दिवस पावसाचा इशारा; ‘या’ ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट
Quick Answers
अंकिता भंडारी प्रकरणात सिक्कीमचे नवनियुक्त राज्यपाल आणि भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत.
अंकिताच्या पालकांनी दिल्लीतील इंडिया गेटवर आंदोलन सुरू केले. यावेळी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली.
कथित व्हीआयपी अँगलबाबत सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदावरील नियुक्ती स्थगित ठेवावी, ही अंकिताच्या आई-वडिलांची प्रमुख मागणी आहे.
न्याय मिळाला नाही आणि दुष्यंत गौतम यांची नियुक्ती रद्द केली नाही, तर मुलीच्या न्यायासाठी संपूर्ण देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलने करू, असा इशारा अंकिताच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






