प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका आणि ऑक्टोबर हीटचा चटका वाढत आहे. त्यातच आता वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात आज पावसाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, पुढील चार ते पाच दिवस पावसाचे वातावरण राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धाराशिव आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
राज्याच्या एका भागात पाऊस तर दुसऱ्या भागात उष्णता असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता असून ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढण्याचा अंदाज आहे.
यंदा राज्यात हवामान विभागाने कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. मान्सून परतल्याचे सांगितले जात असले तरी, आता पुन्हा एकदा वारे फिरल्यामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मतं मिळवण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचवला ‘प्रसाद’; बच्चू कडूंच्या व्हायरल व्हिडिओने अमरावतीत खळबळ
- गौतम गंभीर यांच्या वाढदिवसाचा वेस्ट इंडिजने केला बेरंग! चौथ्या टी-२० सामन्यात भारताचा २४ धावांनी पराभव
- सॅमसनची एकाकी झुंज अपयशी; चौथ्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजचा भारतावर २४ धावांनी विजय, मालिका २-२ ने बरोबरीत
Quick Answers
हवामान विभागाने सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धाराशिव आणि सांगली या ५ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवत येलो अलर्ट जारी केला आहे.
वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचे वातावरण राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकणात दमट वातावरण राहण्याची शक्यता असून ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







