प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: संजय राऊत यांनी दिल्लीतील ज्ञानेश कुमार आंदोलनावरून गंभीर आरोप केले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी भाडोत्री गुंडांना खाकी गणवेश देऊन रस्त्यावर उतरवण्यात आल्याचा दावा त्यांनी (Sanjay Raut) केला आहे.
या आंदोलनात एक वेगळाच ट्विस्ट असल्याचे सांगत राऊत यांनी काही सवाल उपस्थित केले. आंदोलन परिसरात खाकी वर्दीने भरलेल्या गाड्या कोणासाठी आणल्या होत्या, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, रस्त्यावर नेमप्लेटशिवाय दिसलेले पोलीस हे प्रत्यक्षात वर्दी घातलेले गुंड होते, असेही ते म्हणाले.
Sanjay Raut: संजय राऊतांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
दिल्लीतील ज्ञानेश कुमार आंदोलनातील ट्विस्ट: ज्या पोलिसांना रस्त्यावर गुंडागर्दी करताना पाहिले, महिला मुलींवर हात टाकताना दिसले, ते भाजपचे (अमित शहा) नकली पोलिस होते, भाडोत्री गुंडांना खाकी गणवेश देऊन आंदोलकांना रोखण्यासाठी उतरवले होते. दिल्लीत आंदोलनाच्या आसपास खाकी पोलिस वर्दी ने गच्च भरलेल्या गाड्या होत्या कोणासाठी? नेमप्लेट शिवाय जे पोलिस दिसत होते ते अशी वर्दी घातलेले गुंड होते हाच राष्ट्रीय सुरक्षेचा गुजरात पॅटर्न आहे! उघडा डोळे आणि बघा नीट!
रस्त्यावर गुंडगिरी करणारे आणि महिला-मुलींवर हात टाकणारे हे भाजपचे आणि अमित शाह यांचे नकली पोलीस होते, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. पोलिसांच्या वेशात भाडोत्री गुंडांचा वापर करण्याच्या या कृतीला त्यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षेचा गुजरात पॅटर्न’ असे संबोधले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- CJP चा विरोधकांच्या ‘सुप्रीम मार्च’ला पाठिंबा; इंडिया गेटपासून मोर्चाला होणार सुरुवात
- ‘फॉर्म ६’ ला मंजुरी नाही’ सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण; निवडणूक आयोगाला चपराक
- आंदोलनाआधी राहुल गांधींचा गौप्यस्फोट; ‘निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचे मला मेसेज येतात’
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









