प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: ‘छम छम करता…’ या लोकप्रिय गाण्यातील भन्नाट नृत्यासाठी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, या सुपरहिट गाण्यासाठी तिने एकही रुपया मानधन घेतले नव्हते, असा मोठा खुलासा खुद्द सोनालीने नुकत्याच एका मुलाखतीत केला आहे.
या गाण्यामागचा किस्सा उलगडताना सोनालीने सांगितले की, तिला त्यावेळी एका व्यक्तीचा फोन आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर टीम पूर्णपणे नवीन असल्याने, सोनालीच्या सहभागामुळे या मराठी चित्रपटाला चांगला बुस्ट मिळेल, असे तिला सांगण्यात आले होते.
केवळ त्या नवीन टीमसाठी आपण हे गाणे केले असून त्यासाठी कोणतीही फी घेतली नसल्याचे तिने स्पष्ट केले. ‘त्यांनी सांगितल्यानंतर, माझ्याकडून जेवढे शक्य होते ते सर्व मी केले,’ अशी प्रतिक्रिया सोनालीने दिली.
या गाण्यामुळे सोनाली मराठी मनोरंजन विश्वात खूप चर्चेत आली. परंतु, त्यापूर्वीही आपण ‘अनाहत’ या मराठी चित्रपटात काम केले असल्याची आठवण तिने सांगितली. ‘अनाहत’ हा कमर्शियल चित्रपट नसला तरी तो माझा मराठी चित्रपट होता, मात्र त्याची फारशी चर्चा झाली नाही, असेही तिने नमूद केले.
सध्या सोनाली मोठ्या पडद्यावर पूर्वीसारखी सक्रिय नसली, तरी विविध कारणांमुळे ती नेहमी बातम्यांमध्ये असते. सोशल मीडियावरही तिचा चांगला वावर असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नियमितपणे स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
📌 महत्वाच्या बातम्या
- आता महाराष्ट्र बंद होणार! शिवसेना भवनाबाहेर राडा, आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे आक्रमक
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; कंगना राणौत म्हणाल्या, ‘हे तर देशद्रोही’
- राजकारण्यांनी वयाच्या साठीनंतर निवृत्त व्हावे, वेड्यासारखे वागू नये; इंदुरीकर महाराजांच्या विधानाची तुफान चर्चा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









