प्रतिनिधी, 27 सप्टेंबर: निवडणूक आयोगातील कथित हुकूमशाही आणि ‘एसआयआर’ (EC Protest SIR) मधून देशातील सर्वाधिक मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून ४ ऑक्टोबर रोजी संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली असली तरी, या मोर्चावरून महाविकास आघाडीत एकमत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसने उद्या (२८ सप्टेंबर) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोगाविरोधात स्वतंत्र आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्यामुळे आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
या संयुक्त मोर्चाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संमिश्र भूमिका मांडली आहे. मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, अभिजित दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. मात्र, ‘केवळ राजीनामा नको, तर व्यवस्था बदलली पाहिजे आणि ईव्हीएम हटावची मागणी केली पाहिजे’, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
महाविकास आघाडीतील या वेगवेगळ्या भूमिकांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसवर आमची कोणतीही नाराजी नसून, मोर्चासाठी सर्व पक्षांशी चर्चा करणार असल्याचे राऊत म्हणाले. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर मानत असल्याने महाराष्ट्रातही एकत्र चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असते, असे सांगत त्यांनी काँग्रेसला एकत्र येण्याचे आवाहन केले. प्रत्येक वेळी वेगळी भूमिका मांडून चालत नाही, याची आठवणही त्यांनी काँग्रेसला करून दिली.
निवडणूक आयोग आणि इतर संस्थांवर जोरदार टीका करताना राऊत म्हणाले की, देशातील सर्व संस्था या केंद्र सरकारचे घरगडी असल्यासारख्या वागत आहेत. खास करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश हे दबावाखाली आणि प्रलोभनाखाली आहेत. त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- “धर्म, सण घरापुरताच मर्यादित ठेवावा”; डीजेविरोधी लढ्याला सुमित राघवनचा पाठिंबा, विद्यानंद बापटांचा सत्कार
- ‘ज्ञानेश कुमार देशाचे दुश्मन नंबर एक, त्यांना उचलून फेकणार..’ सर्व संस्था मोदी-शाहांचे घरगडी’- संजय राऊत
- “ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय”; ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावरून फडणवीसांचा हल्लाबोल
Quick Answers
निवडणूक आयोगातील कथित हुकूमशाही आणि 'एसआयआर'मधून सर्वाधिक मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे ४ ऑक्टोबर रोजी संयुक्त मोर्चा काढणार आहेत.
काँग्रेसने २८ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक आयोगाविरोधात स्वतंत्र आंदोलनाची घोषणा केली आहे.
मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश दबावाखाली व प्रलोभनाखाली असून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









