Share

अमित शाहांना विषबाधा; ‘असं काय खाल्लं? देशात विष पसरवून कुठे गेले?’, राऊतांचा हल्लाबोल

कर्नाटकात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. शाह यांची प्रकृती आता स्थिर असून ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

Published On: 

Union Home Minister Amit Shah and Shiv Sena UBT leader Sanjay Raut

मुंबई– कर्नाटक दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांचे शनिवारी नियोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांना उलट्या आणि अशक्तपणाचा त्रास जाणवला असला तरी, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमित शाह यांना हुबळी येथील केएलई जगद्गुरू गंगाधर महास्वामीगळू मूरुसाविरमठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे उद्घाटन टाळावे लागले. तसेच, बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एक्सांबामधील श्री बीरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या अनुपस्थितीत प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्येत बिघडल्याने शाह काही काळ हॉटेलमध्येच थांबले होते आणि त्यानंतर ते थेट दिल्लीला रवाना झाले.

या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “शाहांना फूड पॉयजनिंग झालं. असं काय खाल्लं त्यांनी? अख्ख्या देशात विष पसरवून ते कुठे गेले?” असा सवाल राऊत यांनी केला. आपण शाह यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ज्ञानेश कुमार प्रकरण समोर आल्यावर त्यांनी स्वतःला कोंडून घेतल्याचा दावा राऊत यांनी केला. यावेळी राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही जोरदार टीका करत त्यांच्याविरोधात महाभियोग आणणार असल्याचा पुनरुच्चार केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही