Share

मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; छावा महाराष्ट्र सेनेचे आंदोलन

मराठवाड्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून ५० हजारांच्या मदतीसाठी छावा महाराष्ट्र सेनेचे पैठण तहसील कार्यालयासमोर काजू-बदाम वाटून आंदोलन.

Published On: 

Chhava Maharashtra Sena protest in Paithan for Marathwada drought aid

पैठण | किरण काळे पाटील : पैठण तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश (Marathwada Drought) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (दि. २३) छावा महाराष्ट्र सेनेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलकांकडून काजू-बदाम वाटप करण्यात आले.

संघटना प्रमुख किशोर पाटील शिरवत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कृषिमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर तहसीलदार ज्योती पवार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पाणीटंचाई व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आगामी रब्बी हंगामाचे नियोजनही कोलमडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित पीकविमा रक्कम तत्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, नुकसानीचे पंचनामे करून योग्य भरपाई द्यावी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ विनाविलंब द्यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व चारा नियोजन प्रभावीपणे न केल्यास आणि मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनाला छावा महाराष्ट्र सेनेचे प्रदेश सल्लागार किशोर सदावर्ते, मराठवाडा प्रमुख मनोज मुरदारे, जिल्हाप्रमुख साईनाथ कर्डीले, तालुका प्रमुख अर्जुन खराद, युवक जिल्हाप्रमुख किरण काळे पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही