ग्रीनफिल्ड महामार्ग: भूसंपादनावरून करमाडमध्ये राडा; अधिकाऱ्यांच्या उत्तराने मावळला शेतकऱ्यांचा विरोध

शेंद्रा-बिडकीन ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादनाची मोजणी सुरू होताच शेतकऱ्यांनी दर निश्चितीवरून विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांच्या समजुतीनंतर मोजणी प्रक्रियेला गती मिळाली आहे.

Published On: 

Farmers and officials during land measurement for Shendra Bidkin Greenfield highway

Greenfield Highway: शेंद्रा-बिडकीन आणि ढोरेगाव या नव्या ‘ग्रीनफिल्ड’ महामार्गासाठी जमीन मोजणीला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना थेट अडवलं आहे. शेंद्रा-बिडकीन ऑरिक (AURIC) आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून थेट अहिल्यानगर आणि पुण्याकडे जाणाऱ्या या महामार्गाला राज्य सरकारने फास्टट्रॅकवर घेतलं आहे. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार भूसंपादनापूर्वीची जमीन मोजणी सुरू केली. पण करमाड परिसरात मोजणीला येताच शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “आधी जमिनीचा दर निश्चित करा, मगच मोजणी करा”, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

परिस्थिती चिघळताना पाहून महसूल अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. नियम काय सांगतो? जमीन मोजणी पूर्ण झाल्याशिवाय आणि क्षेत्र निश्चित झाल्याशिवाय दर कसा ठरवणार? अधिकाऱ्यांनी ही कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला आणि मोजणी पुन्हा सुरळीत सुरू झाली.

Shendra Bidkin Greenfield Highway Land Acquisition

या रस्त्याच्या भूसंपादनाची धाकधूक बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात एक बैठक झाली होती. तिथे शेतकऱ्यांनी या महामार्गाची अलाईन्मेंट (दिशा) बदलण्याची मागणी केली होती. पण शासनाकडून आता कोणताही बदल होणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर शेतकऱ्यांनी चांगल्या दरासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यातच जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी तातडीची बैठक घेऊन भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते.

उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून या मोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. करमाड परिसरातील एका गावाची मोजणी पूर्णही झाली आहे. यामध्ये गट क्रमांक १८०, १८२ ते १८५, १८७, १८८, १९१ ते १९४ आणि २२२ ते २२४ या गटांचा समावेश आहे. आता मोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाकडून जमिनीला नेमका काय दर मिळतो, याकडेच सगळ्या शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही