Share

‘AI मुळे शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30% कमी करू’; फडणवीसांची नाशिकमध्ये मोठी माहिती

देवेंद्र फडणवीस यांनी शेतीत AI चा वापर करून उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करण्याची योजना सांगितली.

Published On: 

Devendra Fadnavis at Nashik agriculture event

Devendra Fadnavis on AI Technology : बहुजन हिताय-बहुजन सुखाय या तत्वावर ही संस्था काम करते आणि या संस्थेला अनेक दिग्गज व्यक्तींचा आशीर्वाद लाभला आहे. २,००,००० हून अधिक विद्यार्थी आणि २,००० हून अधिक शिक्षक असलेली ही संस्था राज्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. नाशिक जिल्ह्याच्या विकासामध्ये या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या संस्थेचे कौतुक केले आणि कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘मराठा विद्या प्रसारक समाजा’द्वारे चालविल्या जाणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Devendra Fadnavis at Nashik agriculture event

नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असून देशातील द्राक्ष निर्यातीत या जिल्ह्याचा वाटा ८० टक्के आहे. कांदा वर्षातून दोनदा लोकांच्या डोळ्यांत पाणी आणतो, आता कांद्याला भाव चांगला आहे. त्यामुळे, या कार्यक्रमात कांदा भेट मिळाला नाही. नाहीतर एका तरी कार्यक्रमात कांदा भेट मिळतो. आता, काद्याला भाव जास्त आहे, त्यामुळे कांदे भेट मिळाले असते तर घरी तरी नेले असते, असे मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी कार्यक्रमात केले.

शेतकऱ्यांसमोरील आव्हानांचीही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. ते म्हणाले की, “आपला शेतकरी राबतो, मेहनत घेतो उत्पादन खर्च वाढतो आहे. हमीभाव वाढत्या किमतींच्या तुलनेत समाधानकारक नसतात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव ठरतो असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत.”

शेती क्षेत्रात संशोधन केले पाहिजे, खतांच्या व्यवस्थापनासह अनेक गोष्टी करण्याकरिता प्रयत्न करत आहोत. रासायनिक खतांच्या वापरामुळे इतर राज्यातील जमिन पोत खराब होऊन उत्पादकता कमी होत आहे. आपण त्या दृष्टीने काम करत आहोत, इस्रायलमध्ये वाळवंट आहे, कमी पाण्यात शेती करून तिथं क्रांती घडवली, असे कार्य आपण करतोय, अशी माहितीदेखील फडणवीस यांनी दिली.

शेती क्षेत्रात AI चा वापर करुन उत्पादन खर्च 25 ते 30 टक्के कमी करून उत्पादकता वाढवत आहोत. आपण अॅप तयार केले, मशागत ते कापणीपर्यत सर्व मार्गदर्शन करतो. शेतकरी जो प्रश्न विचारतो त्याला उत्तर मिळते. या App चा वापर करून आपल्या उत्पादनाचा फोटो काढला तर पुढच्या काळात हवामान कसे असेल, कोणते रोग येऊ शकतात, त्यासाठीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पुढे फडणवीसांनी सांगितले की “तरुण पिढी शेतीपासून दूर जात आहे, अशा महाविद्यालयाच्या मध्यस्थीने तरुण पिढीला आपण शेती जवळ आणू शकतो. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून काम करू शकतो, कर्जमाफी योजना आपण सुरू केली. मात्र, वारंवार शेतकरी कर्जात अडकतो, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी फायद्याची शेती करण्यासाठी प्रयत्न करावे.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install