Share

बोगस कामगार घोटाळा: मजुरांच्या घामावर दलालांचा डल्ला! बिडकीन बनले केंद्रबिंदू

पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये मोठा बोगस नोंदणी घोटाळा समोर आला आहे. दलालांकडून खऱ्या मजुरांची आर्थिक लूट सुरू असून धनदांडग्यांची नोंदणी केली जात आहे.

Published On: 

Bogas Kamgar Scam fake registration in Bidkin Paithan

पैठण | किरण काळे पाटील : गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा पैसा नेमका जातो कुठे? हा कायम प्रश्न जनसामान्यांना पडला असतो, यावर  बिडकीनमधला प्रकार तुम्हाला नक्कीच सुन्न करणारे उत्तर देईल. बिडकीनमध्ये खऱ्याखुऱ्या मजुरांच्या घामाच्या पैशांवर आता दलालांनी डल्ला मारलाय.

पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात सध्या बोगस कामगार नोंदणीचा मोठा सुळसुळाट सुरू आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली एजंट आणि काही तथाकथित संघटनांनी मजुरांची मोठी आर्थिक लूट चालवली आहे. धक्कादायक म्हणजे, बनावट कागदपत्रांच्या आधारे धनदांडग्यांचीही कामगार म्हणून नोंदणी केली जात असल्याचं समोर आलंय.

Bogas Kamgar Scam: धनदांडग्यांची एन्ट्री, खऱ्या मजुरांवर अन्याय

कामगार कल्याण मंडळामार्फत मजुरांना भांडी, सुरक्षा संच, मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि लग्नासाठी मोठी आर्थिक मदत मिळते. पण, हा लाभ मिळवून देण्यासाठी मध्यस्थांची एक मोठी साखळीच बिडकीनमध्ये सक्रिय झालीय. हे दलाल मजुरांकडून थेट जादा पैसे उकळत आहेत.

बोगस कागदपत्रे आणि खोटे दाखले बनवून अपात्र लोकांची नोंदणी सर्रास सुरू आहे. त्यामुळे जे खरोखर उन्हातान्हात राबतात, प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रात घाम गाळतात, ते गरजू कामगार मात्र या लाभापासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत.

या सगळ्या प्रकाराची आता शासनाने गंभीर दखल घेतली आहे. बोगस कामगारांचा शोध घेण्यासाठी दक्षता पथकाकडून थेट उलट तपासणी सुरू झालीय. बाहेरील जिल्ह्यांची पथकेही आता कसून तपास करत आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या जालना जिल्ह्यातील मंठा आणि मौजपुरीमध्ये तर अनुदानात गैरप्रकार केल्याप्रकरणी थेट गुन्हे दाखल झालेत.

पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, इथे ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ अशी अवस्था आहे.

मजुरांची लूट होत असूनही कोणी उघडपणे तक्रार करायला पुढे येत नाहीये. शासनाचा मूळ उद्देश गरजू मजुरांना आधार देण्याचा आहे. पण जर हा निधी असाच दलालांच्या घशात जात असेल, तर आता बोगस नोंदण्या रद्द करून बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी संतप्त मागणी मजुरांमधून होत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही