Share

तुकाराम मुंढेंना पत्रकाराने विचारलं, ‘इथे किती दिवस टिकणार?’; बदल्यांच्या प्रश्नावर दिलं भन्नाट उत्तर

वारंवार होणाऱ्या बदल्यांवरून तुकाराम मुंढेंनी मोठं विधान केलं आहे. ‘इथे किती दिवस टिकणार’ या प्रश्नावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

Published On: 

Tukaram Mundhe FDA Commissioner Mumbai Press Club Meet the Press

Tukaram Mundhe FDA: २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल २५ बदल्या! कडक शिस्तीचे अधिकारी. धडक कारवाई पण अशा तुकाराम मुंढेंना स्वतःच्याच सतत होणाऱ्या बदल्यांबद्दल नेमकं काय वाटतं?

सध्या मुंढे राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त आहेत. भेसळखोरांवर त्यांचा थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू आहे. रोज नवनवीन कारवाया. त्यामुळे ते पुन्हा एकदा राज्याच्या प्रकाशझोतात आलेत. पण यावर मुंढे म्हणतात, “मी कोणी सेलिब्रिटी नाही. मी फक्त माझं कर्तव्य बजावणारा एक अधिकारी आहे.” बुधवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. तिथेच त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.

वारंवार होणाऱ्या बदल्यांवर मुंढेंचं रोखठोक उत्तर

“व्यक्तीपेक्षा कायम व्यवस्था मोठी असते. माझा भर एक सक्षम आणि प्रभावी यंत्रणा उभारण्यावर आहे. जेणेकरून एखादा अधिकारी बदलला, तरी त्याचं काम थांबणार नाही,” असं मुंढे म्हणाले. त्यांच्या सततच्या बदल्यांवरून पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला. ‘तुम्ही इथे किती दिवस टिकणार?’ यावर मुंढेंनी स्पष्ट उत्तर दिलं. “बदलीचा निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही. तो सरकारचा आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच मी या नोकरीत टिकून आहे.”

गणेशोत्सव आणि महाप्रसादातील अन्न सुरक्षेवरही त्यांनी भूमिका स्पष्ट

“हा विषय फक्त सणांचा नाही. ईद असो वा गणेशोत्सव. अन्न सुरक्षेचे नियम पाळलेच पाहिजेत,” असं ते म्हणाले. फूड बिझनेस ऑपरेटरकडे (FBO) परवाना असणं अनिवार्य आहे. विनापरवाना अन्नपदार्थ बनवणं हा थेट नियमभंग आहे. सण असो वा नसो, नियमांचं पालन ही नियमित प्रक्रिया आहे.

जनतेची सेवा करणं आणि त्यांना सुरक्षित अन्न देणं हेच आपलं ध्येय असल्याचं मुंढेंनी स्पष्ट केलं. मुंढेंनी दिलेल्या या कडक इशाऱ्यामुळे आता अन्न व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही