Bournvita Amway FSSAI Action | तुम्हीही तुमच्या मुलांना ताकद आणि बुद्धी वाढेल म्हणून ‘बॉर्नव्हिटा’ (Bournvita) पाजताय? किंवा ‘१०० टक्के शुद्ध’ खोबरेल तेल वापरताय? या भल्यामोठ्या दाव्यांमागचं सत्य आता चव्हाट्यावर आलंय.
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) आता दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर थेट सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. याचा मोठा दणका ‘बॉर्नव्हिटा’ बनवणाऱ्या मोंडेलेझ (Mondelez) आणि ‘अॅमवे’ (Amway) सारख्या बड्या कंपन्यांना बसलाय. कारवाईच्या भीतीने या कंपन्यांनी आपले दावे गुपचूप मागे घेतलेत.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर FSSAI ची मोठी कारवाई
मोंडेलेझ इंडियाच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींवर FSSAI ने कडक आक्षेप घेतला होता. आरोग्याबाबतचे त्यांचे दावे, पोषणाबाबतची तुलना हे सगळं दिशाभूल करणारं असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळेच मोंडेलेझने तातडीने पावलं उचलली आणि त्यांनी हे सगळे दावे आणि जाहिराती ई-कॉमर्सवरून मागे घेतल्या आहेत.
‘अॅमवे इंडिया’चीही चांगलीच कोंडी झाली
आपल्या ‘१००% प्युअर कोकोनट ऑइल’च्या पॅकिंगवरून ‘१००%’ हा शब्दच हटवलाय. सोबतच त्यांच्या XS या कॅफिनेटेड उत्पादनावरून ‘एनर्जी ड्रिंक’ हा टॅगही काढलाय. अॅमवेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२६ पासून त्यांच्या नव्या उत्पादनांवर हे दिशाभूल करणारे शब्द दिसणार नाहीत. जुना स्टॉक संपेपर्यंत त्यांना वेळ देण्यात आलाय.
फक्त या दोनच कंपन्या नाही, तर अनेक बड्या ब्रँड्सचे धाबे दणाणलेत. सॅपियन्स लॅब्स. जुझा फूड्स यांनीही आपले दावे मागे घेतलेत. जुझा फूड्सने तर लहान मुलांच्या अन्नाबाबत इम्युनिटी आणि हाडं बळकट करण्याचे खोटे दावे हटवले आहेत. विची ॲग्रो प्रॉडक्ट्सवरही कारवाई झाली. त्यानंतर फ्लिपकार्टने त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून थेट बाहेरचा रस्ता दाखवला.
FSSAI ने या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल १५० हून अधिक नोटीस बजावल्या आहेत. यात नेस्ले इंडिया, पेप्सिको, कोका-कोला, रेड बुल आणि डॅनोन सारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश आहे. कारवाई तीव्र झालीय त्यामुळे आता ग्राहकांना फसवून गब्बर होणाऱ्या ब्रँड्सवर मोठी चाप बसणार हे नक्की.
📌 महत्वाच्या बातम्या
- बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा अभूतपूर्व उत्साह! भव्य जलूसमध्ये तरुणाईचा लक्षणीय सहभाग
- संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून
- नेपाळमध्ये महाप्रलय! 62 जणांचा मृत्यू, 500 हून अधिक बेपत्ता; भारतालाही धोका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











