Share

ढोरकीनमध्ये पोलिसांचा छापा: घरातच सुरू होता खाटीकखाना, तब्बल २०० किलो गोमांस जप्त

ढोरकीन (ता. पैठण) येथील कुरेशी मोहल्ल्यात घरातूनच सुरू असलेल्या बेकायदेशीर खाटीकखान्यावर पोलिसांनी छापा मारला. यात तब्बल २०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.

Published On: 

Dhorkin Beef Raid: MIDC Paithan Police seized 200 kg beef in a raid at Dhorkin village Chhatrapati Sambhajinagar

पैठण | किरण काळे पाटील : रविवारी सकाळी ढोरकीन गावात सगळीकडे नेहमीसारखी शांतता होती. पण कुरेशी मोहल्ल्यात एका घरात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. गोवंशाची कत्तल करून थेट घरातूनच मांसाची विक्री सुरू असल्याची अत्यंत गोपनीय माहिती पैठण पोलिसांच्या कानावर पडली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता धडक कारवाई केली आणि अत्यंत धक्कादायक सत्य समोर आलं!

एमआयडीसी पैठण पोलिसांच्या विशेष पथकाने रविवारी, २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी नऊच्या सुमारास ढोरकीन येथील कुरेशी मोहल्ल्यात (Dhorkin Beef Raid) छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी एका घरामधून तब्बल दोन क्विंटल (२०० किलो) गोमांस जप्त केलं आहे. याप्रकरणी एका ६३ वर्षीय वृद्धाला रंगेहाथ पकडण्यात आलं असून पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

घरातच सुरू होता खाटीकखाना; तब्बल २०० किलो गोमांस जप्त

पोलीस हवालदार राहुल सर्जेराव मोहतमल यांनी याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. जलाल रज्जाक शेख (वय ६३, रा. कुरेशी मोहल्ला, ढोरकीन) याच्या घरात हा संपूर्ण अवैध प्रकार सुरू होता. सपोनि मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट जलाल शेख याच्या घरावर धाड टाकली. पोलीस घरात शिरले तेव्हा तिथे कत्तल केलेलं गोमांस विक्रीसाठी ठेवल्याचं उघडकीस आलं.

हा गोरखधंदा अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू होता

पोलिसांनी घटनास्थळावरून ४० हजार रुपये किमतीचे तब्बल २०० किलो गोमांस ताब्यात घेतले आहे. याशिवाय मांस कापण्यासाठी वापरला जाणारा दीड फुटाचा धारदार लोखंडी सुरा आणि एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण ४१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या धडक कारवाईनंतर, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या मांसाचे काही नमुने फॉरेन्सिक (CA) तपासणीसाठी वेगळे काढून सीलबंद करण्यात आले आहेत. तर उर्वरित खराब मांस एका निर्जन स्थळी मोठा खड्डा खोदून पंचांसमक्ष नष्ट (दफन) करण्यात आलं आहे. जलाल शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम ५(C) आणि ९(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भवर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही