Share

यशस्वी जैस्वालनंतर आता श्रीलंकेचा प्रभाथ जयसूर्या अडकला; ICC ने उगारला कारवाईचा बडगा

कोलंबो कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोनंतर आता श्रीलंकेच्या प्रभाथ जयसूर्यावर आयसीसीने आचारसंहिता भंगाची कारवाई करत एक डिमेरिट पॉईंट दिला आहे.

Published On: 

Prabath Jayasuriya leaving the field frustrated during India vs Sri Lanka test match

Prabath Jayasuriya: कधी खेळाडूंची बाचाबाची तर कधी थेट नियमांचं उल्लंघन… भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेली कोलंबो कसोटी सध्या क्रिकेटपेक्षा वादांमुळेच जास्त गाजतेय. नुकतंच यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडो यांच्यात झालेलं ‘हेडबट’ प्रकरण शांत होत नाही, तोच आता श्रीलंकेच्या आणखी एका स्टार खेळाडूवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

आता श्रीलंकेचा मुख्य फिरकीपटू प्रभाथ जयसूर्यावर कारवाई झालीये. मंगळवारी आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जयसूर्याला अधिकृत समज देण्यात आली असून त्याच्या खात्यात एक ‘डिमेरिट पॉईंट’ही जमा करण्यात आला आहे.

बाद झाल्यावर राग अनावर; जयसूर्याला भोवली चूक

नेमकं काय घडलं?

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपत आला होता. भारतीय फिरकीपटू मानव सुथार गोलंदाजी करत होता. त्याच्या शेवटच्या चेंडूवर जयसूर्या बाद झाला. पंचांनी बाद दिल्यानंतर तंबूत परतताना जयसूर्याचा पारा चांगलाच चढला. रागाच्या भरात त्याने सीमारेषेवरील ‘बाउंड्री वेजेस’ला (स्पंज कुशनला) बॅट मारली. ही कृती थेट आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन करणारी ठरली.

जयसूर्याला आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२ नुसार दोषी ठरवण्यात आलं आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेटचे साहित्य किंवा मैदानातील वस्तूंचे नुकसान करण्याशी संबंधित आहे. गेल्या २४ महिन्यांतील त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याला केवळ एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला आहे.

दुसरीकडे, कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. जैस्वालला बाद केल्यानंतर फर्नांडोने त्याला डिवचले. यातून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले. या गैरवर्तनामुळे आयसीसीने दोघांच्याही मानधनातून २५ टक्के रक्कम कापून घेतली आणि प्रत्येकी एक डिमेरिट पॉईंट दिला होता.

थोडक्यात सांगायचं तर, कोलंबो कसोटीतील हा सलग दुसरा दिवस आहे, जेव्हा खेळाडूंवर बेशिस्त वर्तनामुळे कारवाई झाली आहे. त्यामुळे आता पुढे या मालिकेत अजून काय पाहायला मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही