‘मोदींनी चहा विकला याचा पुरावा आणा, राजकारण सोडतो’; संजय राऊतांचं थेट आव्हान

मोदींच्या चहा विकण्याच्या दाव्यावर संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करत फडणवीसांवर निशाणा साधला.

Published On: 

Sanjay Raut challenges PM Modi tea seller claim

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात आणि यावरून त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीकास्त्र देखील सोडले जातात. संजय राऊत रोज प्रसार माध्यमांशी विविध मुद्यांवर संवाद साधत असते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट पंतप्रधान (PM) आणि मुख्यंमत्री (CM) यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातमध्ये चहा विकत होते असे सांगितले जात आहे. मोदी खरोखरच चहा विकत असल्याचा मला कुणी पुरावा आणून दिला तर मी राजकारण सोडेन, असे आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे.

Sanjay Raut challenges PM Modi tea seller claim

“मोदी ज्या काळात गुजरातमध्ये चहा विकत असल्याचा दावा केला जात आहे, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हते. प्लॅटफॉर्मच अस्तित्वात नव्हता. मग मोदींनी चहा कुठे विकला?” असा सवालच राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्यावरही भाष्य केले आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी सामान्य कुटुंबातून आलो. मी नगरसेवकही झालो नसतो. पण मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलो. मोदी चहा विकत होते. ते पंतप्रधान झाले, असे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस परत खोटे बोलत आहेत. मोदींनी लहानपणी चहा विकला नाही. कुणी मला मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा आणून दिला तर मी राजकारणच सोडेन, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.

पुढे संजय राऊत यांनी सांगितले की, “मोदी ज्या काळात चहा विकत होते, त्या काळात गुजरातमध्ये ते रेल्वे स्टेशनच अस्तित्वात नव्हते. मोदींनी लहानपणी नदीत उडी मारली. मगर आली. मगरीची कुस्ती केली. अशा बाललीला सांगितल्या जात आहेत. त्यातला चहा विकण्याची ही बाललीला आहे.”

“या दंतकथा पसरवल्या आहेत. नॉन बायोलॉजिकल माणूस चहा कसा विकेल? तो कशाला शाळेत जाईल? मोदी ज्या काळात चहा विकत असल्याचा दावा केला जातो, पण मोदींचा जन्मच झाला नाही, तर चहा कसे विकतील? फडणवीस खोटे बोलत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

“या देशातील अनेक राज्यकर्ते सामान्य घरातून राजकारणात, समाजकारणात आले आहेत. अब्दुल कलामही आले. सर्वच येतात. तुम्ही नगरसेवक होणार नव्हता, तुम्ही मुख्यमंत्री झाला. तुम्ही महाराष्ट्राचे आभार मानायला हवे होते. तुम्ही धर्माधर्मात तुकडे करत आहात,” अशी टीकादेखील संजय राऊत यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही