Amravati Hospital Fire: NICUला भीषण आग; 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU ला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.

Published On: 

Amravati hospital NICU fire kills three newborns

Amravati Hospital Fire: अमरावतीत (Amravati) आज पहाटे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात (NICU) आग लागल्याने तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या कक्षात पहाटे ३:३० च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन अचानक आग लागली.

त्यावेळी या कक्षात नऊ बालकांवर उपचार सुरू होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला, तर सहा जणांना सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत पालकांनी आपली कोवळी बाळे गमावली आहेत. ही घटना माणसाला निःशब्द आणि सुन्न करणारी आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून, जनतेमध्ये मोठा संताप आणि आक्रोश आहे.

Amravati hospital NICU fire kills three newborns

कमी वजनाची बाळे, अकाली जन्मलेली (साधारण सातव्या महिन्यात) बाळे, जन्मानंतर विकासात्मक समस्या असलेली किंवा विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज असलेली बाळे यांच्यासाठी NICU (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) राखीव असतात.

पहाटे ३:३० च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागली आणि त्यात NICU कक्ष पूर्णपणे जळून खाक झाला. घटनास्थळावरील दृश्यांवरून आगीची भीषणता दिसून येते. आगीमुळे बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला.

स्फोट झालेला व्हेंटिलेटर जुनाट होता का? उपकरणांमध्ये काही तांत्रिक दोष होते का? रुग्णालयापासून अग्निशमन केंद्र किती दूर आहे? आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास किती वेळ लागला? असे प्रश्न विचारले जात आहेत.

पोलीस उपायुक्त (DCP) आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिथे १० ते १५ दिवस वयाच्या बालकांवर उपचार सुरू होते. ही खरोखरच हृदयद्रावक घटना आहे. यापूर्वीही NICU मधील आगीच्या घटनांमध्ये अनेक बालकांचा बळी गेला आहे.

ही नवीन इमारत होती

महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या अतिदक्षता विभागात आग लागली, तो विभाग एका नवीन इमारतीत होता. या रुग्णालयाचे उद्घाटन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. नवीन इमारतीत अशी दुर्घटना घडणे ही गंभीर बाब आहे. या घटनेची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही