Share

मोठी घडामोड! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर उद्या मोठा निर्णय? सरकारने CJP कडे मागितला वेळ

केंद्र सरकारने CJP च्या दोन प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णयासाठी उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितल्याचा दावा CJP ने केला आहे.

Published On: 

cjp meeting

दिल्ली : दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे शिष्टमंडळ यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या बैठकीनंतर, CJP चे प्रवक्ते सौरभ दास (Saurav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी दावा केला की, त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्यांबाबत सरकारने अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, तिसऱ्या मागणीबाबत म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याबाबत (Resignation) निर्णय घेण्यासाठी सरकारने उद्या दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ मागितला आहे.

सौरभ दास यांनी बैठकीत झालेल्या चर्चेचे मुख्य मुद्दे मांडले. ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावला, त्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याच्या प्रस्तावाबाबत सरकार सकारात्मक आहे. तसेच, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान किंवा ‘संसद चलो’ मोर्चावेळी विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व फौजदारी गुन्हे आणि कायदेशीर खटले मागे घेण्याची तयारीही सरकारने दर्शवली आहे. मंत्र्यांशी थेट सुमारे १० मिनिटे सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये शिष्टमंडळाने आपले मुख्य मुद्दे ठामपणे मांडले. दोन प्रमुख मागण्यांबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

‘या’बाबत उद्या दुपारपर्यंत उत्सुकता कायम!

या बैठकीत CJP च्या सर्वात महत्त्वाच्या मागणीवरून म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून जोरदार चर्चा (Meeting) झाली. CJP नेत्यांच्या म्हणण्यानुसार, या मागणीचा विचार करण्यासाठी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी (हायकमांडशी) चर्चा करण्यासाठी सरकारने उद्या (शनिवार) दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय कळवण्यासाठी उद्या पुन्हा एक बैठक होणार आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे CJP ने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही