🕒 1 min read
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभरातून पंढरपूरच्या वारीसाठी पालख्या (दिंड्या) मार्गस्थ झाल्या आहेत. या आषाढी वारीसाठी Ashadhi Wari 2026) राज्यभरातील वारकरी (Warkari) पायी चालत पंढरपूरला जातात. मात्र, आज सकाळी (१३ जुलै) या वारीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) ट्रकचा भीषण अपघात (Truck Accident) झाला. या घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सात वारकरी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी एका वारकऱ्याला वैद्यकीय उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
अपघातातील ट्रक नांदेडचा होता, तर मृत महिला सांगली येथील वारकरी होत्या. या अपघातात राजश्री शंकर भोसले, (Rajshree Bhosale), माधवी राजाराम सरवडे (Madhavi Sarwade) आणि नंदा पवार (Nanda Pawar) या तीन महिलांचा मृत्यू झाला. त्या सर्व सांगली (Sangli) जिल्ह्यातील रहिवासी होत्या. हा ट्रक ‘वारी’साठी लागणारे साहित्य घेऊन जात होता. ट्रकचालक ७० वर्षांचा होता; तापावरील औषध घेतल्यामुळे त्याला डुलकी लागली आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे ट्रकने पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांना धडक दिली. पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी माध्यमाला ही माहिती दिली.
वारीत नेमकं काय घडलं?
जखमी महिलेने माध्यमाशी बोलताना ‘वारी’ मिरवणुकीदरम्यान नेमके काय घडले, याचे वर्णन केले. मागून एक मोठा ट्रक आला आणि थेट गर्दीत घुसला. आम्ही रस्त्याच्या कडेने चालत असताना त्या वाहनाने लोकांना चिरडले आणि एकापाठोपाठ अनेकांना खाली पाडले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे जखमी महिलेने सांगितले.
तीन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू
नंदा पवार, वय 60, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
माधवी राजाराम सलगरे, वय 55, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
राजश्री शंकर भोसले, वय 55, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
जखमी झालेल्या वारकऱ्यांची नावे
अक्काताई बबन कोळी, रा.शिरगाव,जि. सांगली
शांता शिवप्पा अलकोपर, रा.मिरजवाडी, जि. सांगली
कासाबाई जगन्नाथ गस्ते, रा.आष्टा, जि. सांगली
लक्ष्मी विठ्ठल गडदे, रा.नांगोळे,जि.सांगली
शैलजा दिनकर जगताप, रा.कवलापूर, जि.सांगली
मंगल विलास पाटील, रा.कवलापूर, जि. सांगली
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या वारकऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. राज्य सरकारतर्फे मृत वारकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली.
सासवड-जेजुरी मार्गावरील दुर्घटना अत्यंत वेदनादायी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
सासवड-जेजुरी मार्गावर आज झालेला अपघात अत्यंत वेदनादायी आणि हृदयद्रावक आहे. या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तीन वारकरी महिलांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी सांगितले. मी रुग्णालयात जाऊन जखमी वारकरी महिलांची भेट घेतली, त्यांच्या वैद्यकीय उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे वाहन चालवताना रस्त्यावरून चालणाऱ्या वारकऱ्यांबाबत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जखमी महिला लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी मी विठ्ठलचरणी प्रार्थना करते, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवलेंचा मोठा दावा! शरद पवार NDA मध्ये आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते
- ITCZ सक्रिय! 20 ते 30 जुलैदरम्यान मान्सून पुन्हा जोर धरणार; देशात मुसळधार पावसाची शक्यता
- Pandharpur Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ८९ संशयित ताब्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












