🕒 1 min read
एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकं खुपसणं किती महागात पडू शकतं? याचाच लाईव्ह थरार सध्या ‘लॉक अप २’ या रिॲलिटी शोमध्ये पाहायला मिळतोय. ‘अंगुरी भाभी’ फेम शिल्पा शिंदेने (Shilpa Shinde) थेट अभिनेता गोविंदाच्या नात्यावर बोट ठेवलं आणि त्याच्या पत्नीने म्हणजेच सुनीता अहुजाने (Sunita Ahuja) तिला अक्षरशः धुतली.
टीव्हीच्या या वादग्रस्त शोमध्ये शिल्पा शिंदेची वाईल्ड कार्ड एन्ट्री होताच तिने घरातील स्पर्धकांना टार्गेट करायला सुरुवात केली. पण तिचा हाच ओव्हरस्मार्टनेस सुनीता अहुजासमोर चांगलाच अंगलट आलाय.
Sunita Ahuja On Shilpa Shinde
गोविंदाच्या कथित अफेअरचा विषय काढताच सुनीता यांनी शिल्पाला तिची खरी जागा दाखवून दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच गोविंदाच्या अफेअरचे आरोप स्वतः सुनीतानेच काही मुलाखतींमध्ये केले होते.
याच मुद्द्यावरून शिल्पाने शोमध्ये सुनीता यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. “मी गोविंदाची चाहती आहे, पण तुम्ही त्यांच्याबद्दल असं कसं बोलू शकता?” असा सवाल शिल्पाने केला होता. यावर सुनीता भडकल्या.
सुनीता यांनी अत्यंत आक्रमकपणे शिल्पाला सुनावलं की, “कधी स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. हे माझं आयुष्य आहे. माझा नवरा १० ठिकाणी काहीही करेल, पण मी त्याला सोडणार नाही. मरेपर्यंत मी त्याच्यावरच प्रेम करेन.” हे रौद्र रूप बघून शिल्पाने तिथून शांतपणे काढता पाय घेतला.
त्यानंतर संतापलेल्या सुनीता यांनी राम कपूरसमोर आपला राग व्यक्त केला. “तो माझा नवरा आहे. माझ्या नवऱ्याने ५० अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय जातंय? हिला इथे फक्त उंगल्या करायला पाठवलंय. अति केलं तर मी माझ्या लायकीवर येईन,” असा सज्जड दमच त्यांनी भरला.
या शोमध्ये शिल्पाने आकांक्षा चमोला आणि शिवांगी जोशी यांच्याशीही पंगा घेतला आहे. दरम्यान, वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना सुनीता भावूक झाल्या, तेव्हा फराह खानने त्यांची समजूत काढत ‘तू फक्त गोविंदाची पत्नी नाहीस, तर स्वतः एक सुपरस्टार आहेस,’ असं म्हणत त्यांना सावरलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- पंढरपूर वारीपूर्वी वारकऱ्यांना मोठी भेट! मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन आदेश जारी
- Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; IMD ने ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट
- Big News : कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; नव्या समीकरणांची चर्चा सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












