Share

शरद पवार गट NDAमध्ये जाणार? दिल्ली-मुंबईतील हालचालींना वेग

शरद पवार गट NDAमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान आणि रोहित पवारांचा स्पष्ट नकार यामुळे चर्चांना अधिक वेग आला आहे.

Published On: 

Sharad Pawar

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष (NCP) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी होणार का?, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू असून, याबाबतची जबाबदारी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याकडे सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे सांगितले जात आहे.

आमदार-खासदारांची मतं जाणून घेण्याची प्रक्रिया

सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० आमदार आणि ८ खासदार आहेत. केंद्र आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने NDAमध्ये थेट सहभागी व्हावे की बाहेरून पाठिंबा द्यावा, या दोन्ही पर्यायांवर अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यासाठी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान

या चर्चांदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, “या विषयावर चर्चा शंभर टक्के सुरू आहे. आता पाहायचे हे आहे की, शरद पवार गट विचारधारा कायम ठेवणार की सत्तेत सहभागी होणार,” असे म्हटले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांच्याकडून अधिकृत प्रस्ताव आल्यानंतरच काँग्रेस भूमिका स्पष्ट करेल. मात्र, जर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून तसे संकेत मिळाले, तर त्यांना महाविकास आघाडीतच राहण्याची विनंती केली जाईल. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

रोहित पवारांचा स्पष्ट नकार

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मात्र NDAमध्ये जाण्याच्या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, पक्ष हा शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही. रोहित पवार यांच्या या भूमिकेमुळे सुरू असलेल्या चर्चांवर काही प्रमाणात पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला, तरी राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राजकीय चर्चांना उधाण

एकीकडे काँग्रेस नेत्यांकडून सुरू असलेल्या चर्चांना दुजोरा दिला जात आहे, तर दुसरीकडे रोहित पवार यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे पक्षामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगामी काळात शरद पवार कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागले आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने NDAसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही