Share

वैद्यकीय तज्ज्ञांना बांधकामासाठी जबाबदार धरणे चुकीचे; डॉ. नितीन राऊत यांची भूमिका

वैद्यकीय तज्ज्ञांवर बांधकामाची जबाबदारी टाकू नये, अशी मागणी करत डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला.

Published On: 

Dr. Nitin Raut

मुंबई : विदर्भातील शासकीय रुग्णालये (Govt Hospitals) आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical College) तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असताना वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अनावश्यक प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकणे योग्य नाही, असा मुद्दा काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी विधानसभेत उपस्थित केला.

सभागृहात बोलताना डॉ. राऊत म्हणाले की, रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांच्या इमारतींचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) केले जाते. अधिष्ठाता हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असून अभियंते नाहीत. त्यामुळे बांधकामाशी संबंधित बाबींसाठी त्यांना जबाबदार धरणे अथवा त्यांच्यावर दबाव टाकणे योग्य नाही. अशा प्रकारामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचे मनोधैर्य खच्ची होत असून त्यांच्या वैद्यकीय सेवांवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्र्यांचे स्पष्टीकरण

यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचीच असते. संबंधित नेत्र विभागाच्या इमारतीच्या स्ट्रक्चर ऑडिटसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला असून, अहवाल प्राप्त होताच नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात येईल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही