Share

6 मिनिटांत गाणं लिहिलं, 20 मिनिटांत कंपोज; धनुषच्या ‘या’ भारतीय गाण्याने अमेरिकेतही वाजवला डंका!

तमिळ आणि इंग्रजी च्या अफलातून मिक्समुळे त्या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशन पर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर कोट्यवधी व्ह्यूज.

Published On: 

dhanush

🕒 1 min read

Dhanush Famous Song: कधीकधी आपण विचारही करत नाही आणि अचानकपणे अशा एका कलाकृतीचा अविष्कार होतो, जो लोकांच्या मनावर कायमचे अधिराज्य गाजवतो. असंच काहीसं झालं २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका गाण्यासोबत. साऊथ इंडस्ट्रीमध्ये आलेल्या या गाण्याने भारतातच नाही, तर थेट अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशनपर्यंत धुमाकूळ घातला. तमिळ आणि इंग्रजी शब्दांची सुरेख गुंफण असलेल्या या ‘टँग्लीश’ गाण्याचे बोल साऊथ सुपरस्टार धनुषने अवघ्या ६ मिनिटांत लिहिले होते, तर संगीतकार अनिरुद्ध रविचंदर याने हे गाणं फक्त २० मिनिटांत कंपोज केलं होतं. पंधरा वर्षे उलटून गेली, तरी ‘व्हाय दिस कोलावरी डी’ (Why This Kolaveri Di) हे गाणं आजही लोकांना तोंडपाठ आहे.

चित्रपटापूर्वीच गाणं तुफान व्हायरल

हे कल्ट गाणं २०१२ मध्ये आलेल्या ‘३’ या तमिळ सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटातलं होतं, ज्याचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले होते. या चित्रपटात धनुष आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत होते. चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच, १६ नोव्हेंबर २०११ रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं आणि अवघ्या काही तासांत ते इंटरनेटवर व्हायरल झाल. संगीतकार म्हणून अनिरुद्धचा हा पहिलाच सिनेमा होता, पण त्याच्या पहिल्याच गाण्याने इतिहास घडवला. दैनंदिन बोलण्यातले सोपे इंग्रजी शब्द वापरल्यामुळे तमिळ भाषा न समजणाऱ्या देश-विदेशातील श्रोत्यांनाही या गाण्याने वेड लावले. (Dhanush Famous Song)

सोशल मीडियावर ‘कोलावरी डी’ ची क्रेझ  

Dhanush Famous Song: गाणं प्रदर्शित होताच ट्विटरवर (X) ‘कोलावरी’ हा हॅशटॅग भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. पहिल्याच आठवड्यात या गाण्याने युट्युबवर ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले, तर पहिल्या १८ दिवसांत तब्बल ४१ लाख मोबाईलवर हे गाणं डाऊनलोड केलं गेलं. आज या गाण्याला युट्युबवर ६० कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. कोणत्याही मध्यस्थाशिवाय आणि मोठ्या जाहिरातीशिवाय थेट लोकांपर्यंत पोहोचलेलं हे गाणं भारतीय संगीत विश्वातील सर्वात यशस्वी गाण्यांपैकी एक मानलं जातं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही