🕒 1 min read
बॉलीवूडमध्ये कधी कोणता वाद उफाळून येईल आणि कधी जुने खड्डे उकरून काढले जातील, हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. निमित्त ठरलंय ते ड्रामा क्वीन राखी सावंत हिचा एक ताजा आणि खळबळजनक खुलासा! नुकतंच बिग बॉस फेम राखीने १८ वर्षांपूर्वी घडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त किसिंग प्रकरणावर मौन सोडलंय.
अलीकडेच ‘हॉटर फ्लायर’ या प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत राखीने तिच्या आयुष्यातील अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला. यात २००६ साली मिका सिंगच्या वाढदिवसाच्या पार्टीत घडलेल्या घटनेचा समावेश आहे.
Rakhi Sawant on Mika Singh
राखीने स्पष्टच सांगितलं की, “मिकाने मला जबरदस्ती किस केलं होतं आणि हे सगळं तो आधीच ठरवून आलेला.” Rakhi Sawant on Mika Singh controversy हा विषय यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चांगलाच तापला आहे.
या घटनेनंतर राखीच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी खळबळ उडाली होती. कुटुंबातूनही तिला सपोर्ट मिळाला नाही. राखीने या मुलाखतीत सांगितलं की, “तेव्हा माझे वडील म्हणाले होते की, बॉलीवूडमध्ये जाऊ नकोस. त्यांनी माझ्या आईलाही टोमणे मारले. त्यांना हे नाही दिसलं की त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं.” याप्रकरणी राखीने मिकावर थेट केस केली होती, जी जवळपास १५-२० वर्षे कोर्टात चालली.
पार्टीत नेमकं काय घडलं होतं, हे सांगताना राखी म्हणाली की, सगळं काही नॉर्मल होतं. पण तो केक कापून माझ्याजवळ आला आणि त्याने मला किस केलं. सुनिधी चौहान आणि शेफाली जरीवाला यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी तिला नंतर सांगितलं होतं की, मिकाने हे सगळं आधीच प्लॅन केलं होतं.
पण, एवढा मोठा संघर्ष करूनही राखीने आता मोठा निर्णय घेतलाय. “मी आता त्याला माफ केलं आहे. मी आता लोकांना माफ करून टाकते,” असं म्हणत राखीने या जुन्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांतच दुसऱ्यांदा हनिमूनला, पत्नी सोफीसोबत थेट… पाहा PHOTOS
- मॅनफोर्सला युद्धाचा फटका; पेट्रोल-डिझेल नाही, तर आता चक्क कंडोमही होणार महाग!
- कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत यांना जीवे मारण्याची धमकी; ‘त्या’ एका पोस्टने देशभरात खळबळ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












