Share

तृषा कृष्णनची ‘ती’ पोस्ट आणि पहिल्यांदाच घेतलं ‘विजय’चं नाव; ‘त्या’ एका शब्दाने सोशल मीडियावर खळबळ!

साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ‘विजय’ या शब्दाचा उल्लेख आल्याने चाहते अवाक् झाले असून चर्चांना जोरदार उधाण आलंय.

Published On: 

Trisha Krishnan: 'त्या' शब्दाने खळबळ!

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला हजेरी लावली आणि आता थेट सोशल मीडिया पोस्टमध्ये नाव. साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णन (Trisha Krishnan) आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यात नक्की काय शिजतंय? हा प्रश्न पुन्हा एकदा चाहत्यांना पडलाय. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आलाय.

नुकताच तृषा आणि सुपरस्टार सूर्या यांचा नवा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. या यशाचा आनंद साजरा करताना तृषानं काही पडद्यामागचे फोटो शेअर केले. पण या फोटोंपेक्षा तिच्या एका कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

Trisha Krishnan post 

तिने या पोस्टमध्ये लिहिलंय की “माय मॅजिकल मे… आणखी एक विजय, फक्त दैवी गोष्टी…”. यासोबतच तिने वाईट नजर लागू नये म्हणून एक खास इमोजी वापरलाय. Trisha Krishnan हिच्या या पोस्टमधील ‘विजय’ या शब्दाने आता राजकीय आणि मनोरंजन वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच थलपती विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सत्तापालटात तृषाला त्यांचं ‘लेडी लक’ म्हटलं गेलं होतं. शपथविधी सोहळ्यातही ती दिमाखात मिरवली होती. आता तिच्या या नव्या पोस्टमुळे चर्चांना पुन्हा उधाण आलंय.

खरं तर आर. जे. बालाजी दिग्दर्शित हा सिनेमा सुरुवातीला १४ मे रोजी येणार होता. पण काही आर्थिक वादांमुळे सकाळचे शो रद्द झाले होते. सूत्रांनुसार त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री विजय यांनी या प्रकरणात लक्ष घालत विशेष मॉर्निंग शोला परवानगी दिली. त्यामुळे १५ मे रोजी हा सिनेमा यशस्वीरित्या थिएटर्समध्ये पोहोचला.

आता Karuppu Movie हिट झाल्यावर तृषाने तिच्या पोस्टमध्ये थेट ‘विजय’ असा उल्लेख केल्याने चाहते वेगवेगळे अर्थ काढत आहेत. सिनेमाचा विजय की मुख्यमंत्र्यांचा आधार, यावर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही