Share

Rashmika-Vijay Wedding: नवरी नटली, कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? नेटफ्लिक्सनकडून ‘इतक्या’ कोटींची ऑफर

रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेटफ्लिक्सने त्यांना लग्नाच्या व्हिडिओसाठी ६० कोटींची ऑफर दिली होती, पण प्रायव्हसीमुळे जोडप्याने ती नाकारल्याचं समजतंय.

Published On: 

Rashmika Vijay Wedding: ६० कोटींच्या ऑफरला नकार? नेटफ्लिक्सची डील फिस्कटली

लग्नाची तारीख नक्की ठरली की नाही, हे अजून गुलदस्त्यात आहे, पण त्याआधीच आकड्यांचा खेळ सुरू झालाय… नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सध्या इंडस्ट्रीत धुमाकूळ घातलाय. चाहते ‘सनई-चौघडे’ कधी वाजणार याची वाट पाहत असतानाच, आता एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे. या शाही लग्नासाठी एका बड्या ओटीटी प्लॅटफॉर्मने पैशांची थैली रिकामी करण्याची तयारी दर्शवली होती, पण दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील या ‘पॉवर कपल’ने पैशाला नाही तर प्रायव्हसीला महत्त्व दिल्याची चर्चा आहे.

‘नेटफ्लिक्स’ने (Netflix) रश्मिका आणि विजयला त्यांच्या लग्नाचे स्ट्रीमिंग राइट्स (Streaming Rights) विकण्यासाठी गळ घातली होती. ही ऑफर काही साधीसुधी नव्हती, तर तब्बल ६० कोटी रुपये देण्याची तयारी कंपनीने दाखवली होती.

Rashmika Vijay Reject Netflix Offer

सेलिब्रिटी लग्नाचे व्हिडिओ ओटीटीवर विकण्याचा ट्रेंड सध्या जोरात आहे, नयनतारापासून ते हंसिकापर्यंत अनेकांनी याचा फायदा घेतलाय. त्यामुळे रश्मिका-विजय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि रश्मिकाने ही ६० कोटींची ऑफर चक्क नाकारली आहे. लग्नासारखा खाजगी सोहळा ‘पब्लिक इव्हेंट’ होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. भूतकाळातील काही वादांमुळे (Controversies) आणि मीडियाच्या अतिउत्साहामुळे त्यांना लग्नात कोणतीही ‘रिस्क’ घ्यायची नाहीये. त्यामुळे कोट्यवधींचा तोटा सहन करून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर २६ फेब्रुवारी ही तारीख व्हायरल होत आहे, पण याबाबत अद्याप दोघांकडूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. नुकतीच रश्मिका एअरपोर्टवर दिसली होती, तेव्हा पत्रकारांनी लग्नाबद्दल छेडले असता ती फक्त गालातल्या गालात हसली. त्यावरून ‘काहीतरी शिजतंय’ एवढं मात्र नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install