Share

“मी पवार कुटुंबासोबत…” अजितदादांच्या निधनावर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, हे अत्यंत दुःखदायक!

“अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे,” अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली असून त्यांनी पवार कुटुंबाचे सांत्वन केले आहे.

Published On: 

ajit pawar rahul gandhi

दिल्ली – राजकारणात मतभेद असतात, मनभेद नसतात याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं आणि केवळ महाराष्ट्रच नाही, तर दिल्लीचं राजकारणही हादरलं. सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, प्रत्येक नेत्याने आज राजकीय तलवार म्यान केली आहे. काँग्रेसचे नेते Rahul Gandhi यांनीही या घटनेवर अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी पवार कुटुंबाला धीर दिला आहे.

“ही बातमी अत्यंत दुःखदायक…”

नेहमी सरकारवर तुटून पडणारे राहुल गांधी आज अजितदादांच्या जाण्याने गहिवरले. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधी म्हणाले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे”. केवळ अजितदादाच नाही, तर त्यांच्यासोबत असलेल्या सहप्रवाशांबद्दलही राहुल गांधींनी हळहळ व्यक्त केली आहे.

Rahul Gandhi Tweet on Ajit Pawar

या कठीण काळात काँग्रेस पक्ष आणि स्वतः राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेसोबत असल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलंय, “या दुःखाच्या प्रसंगी मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभा आहे. मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करतो”. राजकीय पटलावर अजितदादा आणि काँग्रेस यांच्यात कितीही खटके उडाले असले, तरी आजच्या या दुख:द प्रसंगी राहुल गांधींनी दिलेली ही प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते.

दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अजित पवार जी यांनी गेल्या साडेतीन दशकांत महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले,” अशा शब्दांत शाहांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव केला आहे. एकूणच, अजितदादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढणं आता कोणालाच शक्य नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही