Share

Rupali Thombare Patil: ‘मशिन्स बदलल्यात, हे मतदान कुणाचं?’ रुपाली ठोंबरेंचा रुद्रावतार; मतमोजणी रोखली!

मतमोजणी दरम्यान EVM मशिन्सचे नंबर मॅच होत नसल्याने Rupali Thombare Patil यांनी संताप व्यक्त करत मतमोजणी रोखली. अधिकाऱ्यांना दिला सस्पेंड करण्याचा इशारा.

Published On: 

Rupali Thombare Patil EVM Issue: 'मशिन्स बदलल्या', पुण्यात राडा

पुणे – निवडणूक निकालाच्या दिवशी विजयाचा जल्लोष असतो, पण इथे तर मतमोजणी केंद्रावरच रणकंदन माजलंय. पुण्यात मतमोजणी सुरु असतानाच एका धक्कादायक प्रकारामुळे ‘खळबळ उडाली’ आहे. मशीनचे नंबर आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या यादीतील नंबरमध्ये तफावत आढळल्याने Rupali Thombare Patil चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट मतमोजणी रोखून धरत निवडणूक अधिकाऱ्यांना (RO) धारेवर धरले आहे.

नेमकं काय घडलं?

रुपाली ठोंबरे पाटील यांनी आरोप केला आहे की, “आरओनी आम्हाला जी यादी सही-शिक्क्यानिशी दिली होती, त्यातील मशीनचे नंबर आणि प्रत्यक्षात टेबलवर आलेल्या मशीनचे नंबर मॅच होत नाहीत.” विशेष म्हणजे, हे एका मशीनबाबत घडले नसून, तब्बल १२-१३ मशीनच्या बाबतीत असा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. “एखादी प्रिंट मिस्टेक समजू शकतो, पण इतक्या मशीन्स कशा बदलल्या? आणि जर बदलल्या तर आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?” असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

यावेळी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी प्रशासनाला आणि अप्रत्यक्षपणे भाजपलाही इशारा दिला. “निवडणूक पारदर्शकच झाली पाहिजे. आता कुणाचं चालणार नाही. कमळ-बिमळ काही चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

‘श्रीलंकेसारखा राडा करू…’

पोलिसांनी किंवा प्रशासनाने दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, श्रीलंकेसारखे ‘डबल प्रेशर’ आणू, असा सज्जड दमच त्यांनी भरला आहे. “उमेदवारांना न सांगता मशीन बदलल्याच कशा? हे मतदान कुणाचं आहे? जे करायचं ते कायद्याने करा, नाहीतर वर्षभर जेलमध्ये जाईन, पण तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही, आई जगदंबेची शपथ!” असा इशारा देत ठोंबरे यांनी मतमोजणी केंद्रावर ठिय्या मांडला आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मतमोजणी केंद्रावर Rupali Thombare Patil आक्रमक

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही