🕒 1 min read
राजकोट– क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, याचा काहीच नेम नसतो. एकेकाळी ज्याच्या फिरकीवर बॅट्समन नाचायचे, त्याच गोलंदाजाची जर धुलाई झाली तर? असंच काहीसं राजकोटच्या वनडे मॅचमध्ये घडलं. टीम इंडियाचा स्टार स्पिनर Kuldeep Yadav साठी बुधवारचा दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी त्याला अक्षरशः फोडून काढलं. पण या कठीण काळात कुलदीपचा जुना पार्टनर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.
वाईट परफॉर्मन्सनंतर Yuzvendra Chahal आला मित्राच्या मदतीला
झालं असं की, राजकोटमध्ये टीम इंडियाने दिलेल्या २८४ धावांचा पाठलाग करताना किवी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. विशेषतः कुलदीप यादवच्या १० ओव्हर्समध्ये तब्बल ८२ धावा कुटल्या गेल्या. डॅरिल मिचेल आणि विल यंग यांनी कुलदीपला सेट होऊच दिलं नाही. कारकिर्दीत तिसऱ्यांदा कुलदीपने एका डावात ८० हून अधिक धावा दिल्या. सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली, पण तितक्यात Yuzvendra Chahal ची एन्ट्री झाली.
चहलने आपल्या जुन्या मित्रासाठी ‘X’ (ट्विटर) वर एक खास पोस्ट लिहिली. त्याने स्पष्ट शब्दात सांगितलं, “Kuldeep Yadav is no.1 SPINNER in whole WORLD! #Champion #AnyFormat”. म्हणजेच काय, तर एक वाईट दिवस एखाद्या खेळाडूचं मोठेपण कमी करू शकत नाही, हेच चहलने दाखवून दिलं. ‘कुल्चा’ (KulCha) जोडीची ही मैत्री पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून गेली आहे.
दुसरीकडे, मॅचचा विचार केला तर डॅरिल मिचेलने नाबाद १३१ धावांची खेळी करत एकहाती सामना न्यूझीलंडला जिंकून दिला. आता ३ सामन्यांची सिरीज १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे रविवारी इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेत ‘करो या मरो’ अशी स्थिती असेल. आता या निर्णायक लढतीत कुलदीप जोरदार कमबॅक करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Aamir Khan: ‘हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…’ आमिरच्या एका वाक्याने जिंकली मुंबईकरांची मनं!
- ‘इंटरनॅशनल’ स्कूलबाहेर कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकरचा तिळपापड; म्हणाला, ‘उद्या कोणीही निवडून येऊ दे…’
- IND vs NZ: तिसरा सामना रद्द होणार? इंदूरमध्ये पावसाची शक्यता किती? हवामान खात्याचा मोठा अपडेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












