Share

“नागपूरच्या फडणवीसांना मुंबईचं दुःख काय कळणार?”; राज ठाकरेंचा थेट ‘वर्मावर’ घाव!

MNS Chief Raj Thackeray slams CM Devendra Fadnavis, calling him an ‘outsider’ who cannot understand Mumbai’s core issues due to his Nagpur origins.

Published On: 

Raj Thackeray, Devendra Fadnavis | BMC

मुंबई – मुंबईच्या मातीत जन्माला आल्याशिवाय मुंबईकरांच्या वेदना कळत नाहीत, हे वाक्य सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच गाजतंय. मुंबई कुणाची? हा प्रश्न जुना असला तरी निवडणुकीच्या तोंडावर ‘भूमीपुत्र’ विरुद्ध ‘बाहेरचे’ हा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. निमित्त ठरलंय ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर साधलेला निशाणा. “बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबईत आल्यावर वाटतं की इथे काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं आलबेल आहे,” अशा शब्दांत राज यांनी फडणवीसांच्या ‘नागपूर कनेक्शन’वर बोट ठेवलंय.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी मुंबईच्या प्रश्नांचे मूळ ‘बाहेरून आलेल्या नेतृत्वात’ असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरचे आहेत. त्यांना आणि इतर बाहेरच्या मंत्र्यांना मुंबईत आल्यावर रस्ते, हॉस्पिटल, २४ तास पाणी पाहून वाटतं की या शहराला काय समस्या आहे? कारण ते त्यांच्या गावासोबत तुलना करतात.” ज्यांचा जन्म मुंबईत झाला नाही, त्यांना लोकलच्या धक्क्यांची आणि चाळीतल्या जगण्याची भाषा कधीच समजणार नाही, असा रोखठोक दावा त्यांनी केला.

Raj Thackeray slams CM Devendra Fadnavis

राज यांनी केवळ टीका केली नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या डेमोग्राफीचे भयावह वास्तवही मांडले. “उत्तरेतून रोज ५६ ट्रेन भरून महाराष्ट्रात येतात आणि रिकाम्या जातात,” हे विधान कुणालाही विचार करायला लावणारे आहे. ठाणे जिल्ह्यात जगातल्या कोणत्याही एका जिल्ह्यापेक्षा जास्त म्हणजेच तब्बल ८ ते ९ महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) का झाल्या? याचं उत्तर वाढत्या लोकसंख्येत आणि बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमध्ये आहे, असे गणितच त्यांनी मांडले.

“मराठी माणसाचं डेथ वॉरंट”

सध्याची परिस्थिती म्हणजे मराठी माणसाने स्वतःच्या हाताने स्वतःचे डेथ वॉरंट काढण्यासारखी आहे, असा गंभीर इशाराही त्यांनी (Raj Thackeray) दिला. निवडणुका येतात आणि जातात, पण मुंबईवरचा ताण आणि मराठी माणसाचं अस्तित्व यावर कुणीच बोलत नाही. राज ठाकरेंच्या या विधानाने भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच पेचात पकडलं आहे. आता या ‘नागपूर विरुद्ध मुंबई’ वादाला भाजप कसं उत्तर देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही