🕒 1 min read
कोलकाता: कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे पुन्हा एकदा शहर हादरले आहे. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यात तृणमूल काँग्रेसच्या (TMC) विद्यार्थी संघटनेच्या एका नेत्याचाही समावेश होता. आता, या प्रकरणात आज (२८ जून) पोलिसांनी कॉलेजच्या सुरक्षा रक्षकालाही अटक केली आहे.
या घटनेतील सुरक्षा रक्षकाच्या भूमिकेमुळे पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ( Kolkata Rape Case ) एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Kolkata Rape Case: Security Guard Arrested
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ( Kolkata Rape Case ) असे समोर आले आहे की, सामूहिक बलात्काराच्या वेळी पिनाकी बॅनर्जी नावाचा सुरक्षा रक्षक घटनास्थळी उपस्थित होता. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या सूचनेनुसार तो पीडित तरुणीला त्याच्या गार्ड रूममध्ये सोडून तिथून निघून गेला. त्यावेळी ती तरुणी मदतीसाठी वारंवार विनवणी करत होती, मात्र सुरक्षा रक्षकाने तिला कोणतीही मदत केली नाही, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा रक्षकाने ही घटना महाविद्यालयीन प्रशासनाला किंवा पोलिसांना कळवणे अपेक्षित होते, परंतु त्याने तसे काहीही केले नाही. पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतरच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आणि सुरक्षा रक्षकाची चौकशी केली असता, त्याचा निष्काळजीपणा आणि अप्रत्यक्ष सहभाग समोर आला.
२४ वर्षीय पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत घटनेची मन हेलावणारी आपबिती सांगितली आहे. पीडितेने म्हटले आहे की, ३१ वर्षीय मोनोजित मिश्रा याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तिने त्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपी मिश्रा हा याच कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. तो तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता, असे पीडितेने म्हटले आहे.
घटनेचा क्रम सांगताना पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे की, “आरोपीने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती केली. त्यानंतर मी नकार देत प्रतिकार केला. मी रडत-रडत त्याला मला सोडण्यास सांगितले. मी आरोपीच्या पाया पडले, मला जाऊ देण्याची विनंती केली, पण त्याने ऐकले नाही आणि मला गार्डच्या खोलीत घेऊन गेला,” अशी भयावह माहिती पीडितेने पोलिसांना दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- उच्च न्यायालयाचा दणका: “रेरा नोंदणी असली तरी बेकायदा बांधकाम नियमित करता येणार नाही!”
- ‘या’ दोन राशींवर असते शनिदेवाची असीम कृपा; अपार धनलाभासह मेहनतीने बनतात श्रीमंत!
- “मित्रच मैत्रिणीवर बलात्कार करत असेल तर काय करणार?” खासदाराचं वादग्रस्त विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










