Share

अक्षयला जॅकपॉट! ‘हाऊसफुल 5’ ने दोन दिवसांत मोडले 14 चित्रपटांचे रेकॉर्ड!

Akshay Kumar’s Housefull 5 collects ₹50 crore in 2 days, enters top 8 of 2025, smashes 14 film lifetime records.

Published On: 

Akshay hits jackpot! 'Housefull 5' breaks 14 film records in two days!

🕒 1 min read

मुंबई : अक्षय कुमारचा बहुचर्चित मल्टीस्टारर सिनेमा ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्रपटगृहांमधून स्पष्ट दिसतेय. रिलीजच्या पहिल्याच दिवशी २४ कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल ३० कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे दोन दिवसांतच ‘हाऊसफुल 5’ ने ५० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे.

चित्रपटात २० पेक्षा अधिक कलाकार असून विनोद आणि मर्डर मिस्ट्री यांचं कॉम्बिनेशन प्रेक्षकांना भावलंय. दोन वेगवेगळ्या एंडिंगसह रिलीज झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

‘Housefull 5’ breaks 14 film records in two days!

या दमदार कामगिरीनंतर ‘हाऊसफुल 5’ २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आठव्या चित्रपटाच्या यादीत पोहोचला आहे. या यादीत ‘छावा’, ‘रेड 2’, ‘स्काय फोर्स’, ‘सिकंदर’, ‘केसरी 2’, ‘जाट’ आणि ‘भूल चुक माफ’ हे चित्रपट पुढे आहेत. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच ‘हाऊसफुल 5’ ने ‘द डिप्लोमॅट’, ‘सनम तेरी कसम (री-रिलीज)’ यांच्यासह आणखी १२ चित्रपटांचे आजवरचे कलेक्शन मागे टाकले आहे.

विशेष म्हणजे, या यादीतील ‘देवा’ (33.9 कोटी) आणि ‘द डिप्लोमॅट’ (38.97 कोटी) या दोन चित्रपटांपेक्षा ‘हाऊसफुल 5’ ने केवळ दोन दिवसांत जास्त कमाई केली आहे. यामुळे अक्षय कुमारला या चित्रपटाच्या निमित्ताने जबरदस्त ‘जॅकपॉट’ लागल्याचं मानलं जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही