पुणे – मुळशी परिसरात वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, आरोपी पती व सासरच्या लोकांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद करताना वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. या वादग्रस्त विधानामुळे संतापाची लाट उसळली आहे.
वकिलांनी कोर्टात असा दावा केला की, वैष्णवी दुसऱ्या पुरुषांशी चॅट करत होती आणि तिची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. या विधानावर समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अभिनेता हेमंत ढोमे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
Hemant Dhome Slams Hagawane Family Lawyer
एक्स (Twitter) वर हेमंत ढोमे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले, “वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे… कठीण आहे!.”
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय शिरसाटांचा संताप! “रात्रीची दारू उतरलेली नसेल…” राऊतांवर घणाघात
- “शिंदे आणि अजितदादा दोघंही संवादात कमजोर!” – फडणवीसांचा रोखठोक दावा
- ‘माझी औकात नाही, म्हणत कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना सुनावलं; राज्यात शो घेणार असल्याची घोषणा!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








