🕒 1 min read
सांगली | प्रतिनिधी – राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadnavis ) यांनी सांगलीतून भाजपचा प्रचाराचा बिगुल वाजवला. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून, भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं.
फडणवीस म्हणाले, “जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका एकत्र घेतल्या जातील आणि दीड महिन्यात या निवडणुका उरकल्या जातील.” सांगलीमध्ये आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
Devendra Fadnavis launched BJP’s campaign for upcoming local body elections
यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत म्हणाले की, “ठाकरे सरकारच्या काळात राज्यातील विकासकामे ठप्प झाली होती. आता संस्थात्मक सुधारणा गरजेच्या आहेत.”
या दौऱ्यात फडणवीस यांच्या हस्ते सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचं आणि कडेगाव-आटपाडी पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सांगली पोलिस दलासाठी मिळालेल्या 19 नव्या वाहनांचं लोकार्पणही फडणवीसांनी केलं. कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, विशाल पाटील, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, विश्वजित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
📌 महत्वाच्या बातम्या
- “पिसाळलेल्या संभाजी भिडेची नसबंदी करा!” – भिडे यांच्या ‘शिवराज्याभिषेक’ वक्तव्यावरून शिवप्रेमी संतापले
- ‘पिंकीताई’चा करिश्मा: वैष्णवीला बोलूही देत नव्हती! – मोठ्या सुनेनं उघड केला नणंदेचा खरा चेहरा
- “हगवणे, तुला पश्चाताप होतोय का?” – वाचा राजेंद्र हगवणेंचं धक्कादायक उत्तर!













