🕒 1 min read
पुणे – पुण्यातील हडपसर भागात २२ वर्षीय विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी (वय २२) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं ( Deepa Pujari ) नाव आहे. अवघ्या महिन्याभरापूर्वीच म्हणजे १८ एप्रिल रोजी तिचं लग्न झालं होतं.
लग्नात दीपाच्या वडिलांनी ४ तोळे सोनं आणि तब्बल १० लाख रुपये खर्च केला होता. पण सासरकडून भांडी, फ्रीज, इतर घरगुती वस्तू दिल्या नाहीत, असा आरोप करत तिचा छळ सुरू झाला. नवरा, सासू, सासरे आणि दीर तिच्यावर सातत्याने शिवीगाळ आणि मारहाण करत होते.
Pune Bride Deepa Pujari Dies by Suicide Over Dowry
दीपाने हा छळ सहन न करता लग्नानंतर काही दिवसातच माहेरला निघून गेली. आपल्या वडिलांना ही परिस्थिती सांगितली. माहेरी गेलेली असताना सासऱ्यांनी मध्यस्थी करून तिला परत येण्याचा आग्रह केला. दीपाने त्यांना एक संधी दिली, पण परिस्थिती अजूनच बिकट झाली. तिच्यावर होणारा छळ वाढतच गेला.
या छळाला कंटाळून दीपाने १९ मे रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर ताजी असून, समाजात लग्नातील हुंडा प्रथा आणि महिला छळाविरुद्ध गंभीर चर्चा सुरू झाली आहे. महिलांना सुरक्षेची हमी देण्यासाठी आणि अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कायद्यात कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाढत आहे.
या घटनेतून समाजाला एकदा पुन्हा विचार करावा लागेल की, पैशासाठी आणि वस्तूंसाठी नववधूंना छळणे, मानसिक त्रास देणे कितपत न्याय्य आहे? नवविवाहित जीवनाचा प्रारंभ अशा वेदनादायक घडामोडींनी झाला तर त्या कुटुंबातील संस्कृती आणि मूल्ये कुठे जातात?
📌 महत्वाच्या बातम्या
- गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं! हुंड्यासाठी वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाचा तमाशा समोर
- फॉर्च्युनर, सोनं दिलं… तरीही छळ; अखेर 11 महिन्यांचं बाळ गुंडाकडून रस्त्यावर परत आलं!
- “माझं नाव घेतलं म्हणजे तुमचं काम झालं!”; रुपाली चाकणकरांचा खडसे यांच्यावर जोरदार वार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












