🕒 1 min read
पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबीयांच्या अनेक धक्कादायक कृत्यांचा पर्दाफाश होत आहे. एकीकडे सुनेला हुंड्यासाठी छळलं जात असताना, दुसरीकडे या कुटुंबाने बैलाच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिला बैलासमोर नाचवलं होतं, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हगवणे कुटुंबाच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला होता. त्यावेळी स्टेजवर फक्त बैल उभा होता आणि समोर गौतमी पाटील नाचत होती. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या कार्यक्रमात मंचामागे दिसणारा फोटो सुशील हगवणे यांचा असून, तो वैष्णवीचा दीर होता.
Gautami Patil Danced for Bull on Birthday
हगवणे कुटुंबीयांवर आधीच वैष्णवीच्या आत्महत्येसंदर्भात छळाचे आरोप झाले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. आता गौतमी पाटील प्रकरण उघड झाल्यानंतर हगवणे कुटुंबाचा राजकीय आणि सामाजिक मुखवटा पूर्णपणे गळून पडला आहे.
राजेंद्र हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशीचे माजी सभापती होते. हे कुटुंब शेती व दूध व्यवसायातून पुढे आले. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे त्यांचा राजकारणात शिरकाव झाला. राजेंद्र, सुशील आणि सुशांत या तिघांचाही स्थानिक राजकारणात सक्रीय सहभाग आहे.
महत्वाच्या बातम्या
- फॉर्च्युनर, सोनं दिलं… तरीही छळ; अखेर 11 महिन्यांचं बाळ गुंडाकडून रस्त्यावर परत आलं!
- “माझं नाव घेतलं म्हणजे तुमचं काम झालं!”; रुपाली चाकणकरांचा खडसे यांच्यावर जोरदार वार
- सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी गेली; दुसरी सूनही म्हणते – ‘मीसुद्धा संपले असते’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












