🕒 1 min read
प्रतिनिधी – आयपीएल 2025 नंतर भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार असतानाच, अंडर-19 क्रिकेट संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने अधिकृत पत्रकाद्वारे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघ जाहीर केला असून, या संघात महाराष्ट्रातील दोन खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
आयुष म्हात्रेला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीलाही संधी मिळाली आहे. इंग्लंड विरुद्ध 5 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
Ayush Mhatre Named U19 India Captain for England Tour, Vaibhav Suryawanshi in Squad
या दौऱ्याची सुरुवात 24 जूनपासून प्रॅक्टिस मॅचने होईल. त्यानंतर 27 जूनपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल आणि 7 जुलैला अखेरचा सामना होईल. त्यानंतर 12 जुलैपासून कसोटी मालिकेला प्रारंभ होईल.
अंडर-19 टीम इंडिया (इंग्लंड दौरा):
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार/विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर एस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, युद्धजित गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग.
India U-19 Tour of England 2025 – Full Time Table
🏏 एकदिवसीय (ODI) मालिका – ५ सामने
| दिनांक | वार | सामना |
|---|---|---|
| २४ जून २०२५ | मंगळवार | ५० षटकांचा सराव सामना |
| २७ जून २०२५ | शुक्रवार | पहिला एकदिवसीय सामना |
| ३० जून २०२५ | सोमवार | दुसरा एकदिवसीय सामना |
| २ जुलै २०२५ | बुधवार | तिसरा एकदिवसीय सामना |
| ५ जुलै २०२५ | शनिवार | चौथा एकदिवसीय सामना |
| ७ जुलै २०२५ | सोमवार | पाचवा एकदिवसीय सामना |
🏏 कसोटी मालिका – २ सामने (४ दिवसांचे)
| दिनांक | वार | सामना |
|---|---|---|
| १२ – १५ जुलै २०२५ | शनिवार – मंगळवार | पहिली कसोटी |
| २० – २३ जुलै २०२५ | रविवार – बुधवार | दुसरी कसोटी |
📌 महत्वाच्या बातम्या
- “सासऱ्याला जेरबंद करा, सहा पथकं लावा!” – वैष्णवी प्रकरणावर अजित पवारांची तीव्र प्रतिक्रिया
- “माझे पती नसताना हे लोक घरात घुसून…”; हगवणे कुटुंबीयांविरोधात थोरल्या सुनेचा धक्कादायक आरोप
- लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर फासावर लटकवा! – अजित पवारांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












