Share

सूरज चव्हाणचा बिग बॉस इफेक्ट सिनेमावर दिसलाच नाही; ‘झापुक झुपूक’च्या कमाईत घसरण

Suraj Chavan much-awaited debut film ‘Zapuk Zupuk’ fails to impress at the box office, collecting only ₹67 lakh in its first three days. Here’s the detailed day-wise earnings report.

Published On: 

Suraj Chavan's Bigg Boss effect was not seen at all in cinema: 'Zhapuk Zhapuk' revenue drops

🕒 1 min read

मुंबई:

‘बिग बॉस मराठी’च्या विजेता सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan) पदार्पणाचा सिनेमा ‘झापुक झुपूक’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कमाल करू शकलेला नाही. केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ निर्मित या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत फक्त ₹67 लाख रुपयांचीच कमाई केली आहे.

टीझर आणि ट्रेलरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण, प्रत्यक्षात चित्रपटगृहात मात्र गर्दी फारशी दिसली नाही. विशेषतः रविवारी म्हणजे विकेंडच्या अखेरीस कमाईत घट झाली, जे अपेक्षेविरोधी ठरले. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई ही कमीच आहे. ‘झापुक झुपूक’चं पहिल्या तीन दिवसांचं कलेक्शन हे काही लाखांमध्येच आहे.

Suraj Chavan Bigg Boss effect was not seen at all in cinema: ‘Zhapuk Zhapuk’ revenue drops

पहिल्या दिवशीचे कलेक्शन हे 24 लाख, तसेच दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन हे सुद्धा 24 लाख आणि तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन हे 19 लाख  असे सगळे मिळून तीन दिवसांचं कलेक्शन फक्त 67 लाख आहे.

सिनेमाबाबत सुरूवातीला उत्साह होता, कारण सूरज चव्हाणला ‘बिग बॉस मराठी’मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण, ‘झापुक झुपूक’च्या कमाईने या लोकप्रियतेचं रुपांतर तिकीट खिडकीवर होईलच असं नसतं, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

सध्या ‘झापुक झुपूक’च्या अधिकृत कलेक्शनबाबत चित्रपटाच्या टीमकडून कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. मात्र, सॅकनिल्कनं दिलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्या विकेंडमध्ये हा सिनेमा 1 कोटीचा टप्पाही गाठू शकलेला नाही.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!